Home चंद्रपूर तुम्ही नळ टॅक्स भरला का मनपाची कारवाई नेहरू नगरसह अनेक प्रभागातील नळ...

तुम्ही नळ टॅक्स भरला का मनपाची कारवाई नेहरू नगरसह अनेक प्रभागातील नळ जोडणी खंडित

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  पाणीकर थकीत असल्याने मनपाच्या पथकाने नेहरूनगर वॉर्ड येथील विद्या कुंभारे व मंगेश साळुखे यांची नळ जोडणी खंडित केली. पाणीकर वसुलीसाठी मनपाचे ५१ अधिकारी-कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. नेहरूनगर येथील या दोन्ही नळधारकांकडे ६ हजार ५११ रुपयांची थकबाकी होती. वसुली पथकाद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही नळधारकांनी कराचा भरणा न केल्याने कारवाई झाली. यापूर्वी सुद्धा नागपूर रोड, जनता कॉलेज चौक,वडगाव वार्ड,बंगाली कॅम्प,बालाजी वार्ड, सरकार नगर, इत्यादी ठिकाणी सुद्धा नळ जोडणी खंडित केलेली आहे. आतापर्यंत पथकाने १०४ नळधारकांचे नळ खंडित केले. नळधारकांनी थकीत कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणीपुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्र. १ संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्र. २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्र. 3- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे करावा, असे आवाहन मनपाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here