अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
गंगुबाई जोरगेवार यांचे दुःखद निधन…..
आमदार किशोर जोरगेवार यांना मातृशोक,
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची आई, श्रीमती गंगुबाई जोरगेवार यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबासह समाजावर मोठा दुःखाचा ठसा राहिला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
गंगुबाई जोरगेवार यांनी “अम्मा का टिफिन” उपक्रमाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण कार्य सुरू केले, ज्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. आमदार किशोर जोरगेवार यांचा आदर्श ठरलेल्या या मातेस स्वतःचा पिढीजात टोपल्या विकण्याचा व्यवसाय कायम ठेवला. त्यांनी गर्व न करता महानगरपालिका बिल्डिंगजवळ आपल्या व्यवसायात मेहनत घेतली.
त्यांच्यावर दोन मुले, एक मुलगी, सुना, आणि नातवंडे असा विस्तृत आप्तपरिवार आहे. गंगुबाई यांचे अंत्यसंस्कार २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी शांतिधाम येथे होणार आहेत.
त्यांच्या योगदानामुळे अनेकांना मदतीचा आधार मिळाला, आणि त्यांची आठवण सदैव जिवंत राहील.