Home महाराष्ट्र मनसे वार्ता :- यावर्षी राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या भेट वस्तू देऊन...

मनसे वार्ता :- यावर्षी राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या भेट वस्तू देऊन साजरा होणार.

महाराष्ट्र सैनिकांना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचं भावनिक आवाहन.

मुंबई :-

महाराष्ट्राचे भाग्यविधाते मराठी मनाची धाडकन हिंदूजननायक मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा दरवर्षी दिनांक 14 जून ला होणारा वाढदिवस महाराष्ट्र सैनिकांसाठी मोठा दिवस असतो. कारण या दिवशी राजसाहेब मोठ्या आत्मीयतेने अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांना सुद्धा भेटतात व त्यांच्या कडून आलेल्या भेटवस्तू स्वीकारतात. खरं त्या भेट वस्तू सगळ्याच मौल्यवान असतात असे नाही पण राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी त्या खरोखर मौल्यवान असतात कारण त्यात महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा व प्रेम असते त्यामुळे त्या सर्व भेट वस्तूंचा मोठा साठा राजसाहेबांकडे असेल आणि म्हणूनच येणारा 14 जून चा वाढदिवस काही वेगळ्या पद्धतीने व्हावा व त्यातून लोकांना मदत मिळावी या हेतूंनी राजसाहेब ठाकरे यांनी शक्कल लढवली आणि वाढदिवशी भेटायला येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलं.

महाराष्ट्र सैनिकांना केलेल्या आवाहनातं ते काय म्हणाले असेल याबद्दल सर्वानाच उत्सुकता आहे, ते आवाहन करतात की “दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.

पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.

सकाळी ८:३० ते १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन.तेंव्हा भेटूया १४ जूनला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here