Home महाराष्ट्र मनसेचे मराठवाड्यातील लातूर ग्रामीण चे उमेदवार संतोष नागरगोजे यांचे संपर्क अभियान जोरात.

मनसेचे मराठवाड्यातील लातूर ग्रामीण चे उमेदवार संतोष नागरगोजे यांचे संपर्क अभियान जोरात.

गावखेड्यावर छोटेखांनी बैठका घेऊन मनसेचे उमेदवार मागताहेत मतरुपी आशीर्वाद.जनतेचे मोठे समर्थन.

लातूर :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला व मनसे पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले, मात्र त्यादरम्यान त्यांनी मराठवाड्यातील लातूर ग्रामीण ची उमेदवारी मनसे सरचिटणीस तथा शेतकरी सेना प्रांताध्यक्ष संतोष नागरगोजे यांना जाहीर केली आणि ते मराठवाड्यातील मनसेचे पहिले उमेदवार ठरले आहे, दरम्यान संतोष नागरगोजे यांच्याकडे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक पद असल्याने त्यांनी विदर्भातील दौरा आटोपून लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मनसे संपर्क अभियान राबविले आहे व या त्यांच्या मनसे संपर्क अभियांनाला गावागावात मोठे जनसमर्थन मिळतं आहे.

जिथे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नसताना मनसेने महाराष्ट्रातील काही मोजक्या जागेवर आपले उमेदवार घोषित करून उमेदवारांना कामाला लावले आहे, कारण मागील सन 2019 च्या निवडणुकीत ऐन वेळेवर उमेदवार दिल्याने प्रचारला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे राजकीय समीकरण वेळोवेळी बदलत असतांना मनसे उमेदवार त्यामध्ये मागे पडले ती उणीव भरून काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील सगळ्याचं विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन जिथे पक्षाचे चांगले उमेदवार आहे तिथे उमेदवाराची घोषणा केली आहे,

दरम्यान मराठवाडा क्षेत्रात मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी बाजी मारली असून त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघातील गावागावात संपर्क अभियान सुरू केले आणि आज रेणापूर तालुक्यातील मौजे रामवाडी(कोष्टगांव)येथे गांवकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला आणि मतदान रुपी आशीर्वाद देण्याची विनंती केली, यावेळी मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे, उप विभागाध्यक्ष शिवराज सिरसाट, शहाजी केंद्रे, विश्वनाथ मुंडे,परमेश्वर घुले,सचिन केंद्रे,सूरज गायकवाड,रामवाडी शाखाध्यक्ष भरत होळंबे,महादेव होळंबे,शरद बोंडगे,गणेश होळंबे यांच्यासह गावकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here