जंगली डुकरांच्या हल्ल्यात जखमी युवकास आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
सावली:-सावली तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु असून वारंवार जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना होत आहेत, दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ ला शेतात काम करीत असलेल्या मौजा.घोडेवाही येथील रहिवासी सौरव विलास नागापुरे वय, 18 वर्षे या युवकावर रानटी डुक्कराने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला सावली रुग्णालयात भरती केले व नंतर तात्पुरते उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर केलेले आहे.
सकाळी सौरव हा आपल्या शेतावर गेला असता अचानक रानटी डूकरांने हल्ला चढविला. या हल्ल्यातून सौरव ने स्वतची सुटका करण्याचा प्रयत्न केला पण डूकरांने एकसारखा हल्ला चालूच ठेवल्याने सौरव गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या कमरेला जास्त मार असून हात, पाय व डोक्याला मार लागलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना माहिती दिली, घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी सौरव नागापुरे या युवकास पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाठवली व सदर वन विभागास वन्य प्राणांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
आर्थिक मदत देताना सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,नगरसेवक मा.अंतबोध बोरकर,घोडेवाही येथील काँग्रेस कार्यकर्ते मा.कुंतेश्वर मेश्राम,मा.बाळू रामटेके,मा.संदीप शेंडे,मा.आशिष महाडोरे,मा.इतिहास दुधे आदी उपस्थित होते.