Home Breaking News महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार…..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषणा केली. या दोन्ही राज्यात १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान मतदान होणार आहे. Maharashtra vidhansabha Election 2024

दोन्ही राज्यांचे निकाल ४ ऑक्टोबरला एकाच वेळी लागणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकाही या दोन राज्यांसोबत होईल, असे मानले जात होते.

मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. Vidhansabha nivadnuk announced…

त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल, असा अनुमान काढण्यात येत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही तसे संकेत दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.

जम्मू-काश्मीरमध्ये १८ व २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान होईल. तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला एकाच टप्यात मतदान होणार

सत्ताधाऱ्यांना सोयीचे !

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजना जाहीर केल्या आहेत.

या योजनांचा लोकांना लाभ मिळाला तरच त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. यामुळेच निवडणूक लांबणीवर जाणे हे सत्ताधारी पक्षाला आवश्यकच होते.

महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. अशा स्थितीत तेथेः अनेक टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. सणासुदीचे दिवस आहेत.

गणेशोत्सव, पितृ पक्ष नवरात्री, दिवाळी असे मोठे सण तोंडावर आहेत. त्यामुळे सण-उत्सव पार पडल्यानंतरच महाराष्ट्रात निवडणुका होतील.

– राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

आहे. दोन्ही राज्यांत ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. Maharashtra vidhansabha Election announced Election Commission…

खोऱ्यात १० वर्षानंतर लोकशाहीचा उत्सव पुढे बोलतना राजीव कुमार म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी विधानसभा

काश्मिरात असे होईल मतदान टप्पा १ २४ जागा १८ सप्टेंबर टप्पा २ २६ जागा २५ सप्टेंबर ४० जागा १ ऑक्टोबर

टप्पा ३ हरियाणात १ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. Big update vidhansabha election Maharashtra..

हरियाणात २.१ कोटी एकूण मतदार

हरियाणामध्ये एकूण ९० विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण २.१ कोटी एकूण मतदार आहेत.

१ कोटी ६ हजार पुरुष, तर ९५ लाख महिला मतदार आहे. ४ लाख ५२ हजार युवा मतदार आहेत. यासाठी २० हजार ६२९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. Panchayat Raj election 2014

निवडणूक होत आहे. येथील लोक निवडणुकांसाठी उत्साही आहेत. घाटी नागरिकांनी बुलेट, बायकॉट नाही, तर बॅलेट पेपर निवडले आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची ऑक्टोबर महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील निवडणूक

कोणत्या राज्यात विधानसभेची मुदत कधीपर्यंत ?

• हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे ३ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर रोजी संपतो.

■ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

॥ यानुसार मुदतीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका घेण्याचीही निवडणूक समितीची योजना आहे.

॥ झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. झारखंडच्या विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी २०२५ मध्ये संपत आहे.

प्रक्रिया ५ ते २० नोव्हेंबर या दरम्यान पार पडेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

झारखंड विधानसभा डिसेंबरमध्ये संपत असली तरी महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. तत्पूर्वी येथे निवडणूक घेणे बंधनकारक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here