आंदोलनाचा धसका घेत जिल्हापरिषद प्रशासनाने रेणापुर तालुक्यातील खलंग्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत केली शिक्षकांची नियुक्ती.
रेणापुर :–
तालुक्यातील मौजे – खलंग्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1 ते 7 वर्ग असून केवळ 4 शिक्षक अध्यापन करत होते, दरम्यान शाळेत शिक्षकांची 2019 पासून बाकी पदे रिक्त होती. यासंदर्भात गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला पण ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली. शेवटी पालकांनी वैतागून 12 ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद दिले आणि पालकांनी मनसेचे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लगेचच शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांना खलंग्री गावात जावून आंदोलनकर्त्यांशी बोलून तात्काळ रिक्त पदे भरा असे सांगितले होते, परंतु B.D.O.आणि B.O. यांनी 14ऑगस्ट रोजी खलंग्री गावाकडे गेल्यावर शिक्षकांची रिक्त पदे आम्ही लवकरच भरू असे फक्त आश्वासन दिले होते व पालकांना 15ऑगस्ट रोजी तुम्ही आंदोलन करू नका अशी विनंती केली, त्यावर पालकांनी शिक्षक द्यायचे असतील तर लगेच द्या अन्यथा 15 ऑगस्ट रोजीही विध्यार्थी शाळेत येणार नाहीत अशी भूमिका घेतली. त्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी शाळेत झेंडा वंदन करिता नसताना खलंग्री येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांना स्वतःचं राष्ट्रगीत म्हणत ध्वजारोहण पार पाडावे लागले.
दरम्यान खलंग्री येथील जिल्हा परिषद शाळेत 15 ऑगस्टला घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत शेतकरी नेते संतोष नागरगोजे यांनी खलंग्री येथील पालक आणि विद्यार्थी यांना सोबत घेऊन जोरदार निदर्शने करत शिक्षण विभागाचा निषेध व्यक्त केला. त्यामुळं ही बातमी झी 24 तास, टीव्ही -9 मराठी व साम टीव्ही ला प्रकाशित करण्यात आल्याने शासन प्रशासनाला घाम फुटला आणि मिडियाच्या माध्यमातून शासन व प्रशासनास धारेवर धरले गेल्याने व ‘या राज्याला शिक्षण मंत्री आहे की नाही’ अशी टीका केली व शिक्षण विभागाला निर्वाणीचा इशाराच नागरगोजे यांनी दिल्याने 16 ऑगस्ट रोजी मनसे नेते श्री संतोष नागरगोजे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या सोबत बैठक होऊन खलंग्रीकरांची व शेतकरी नेते संतोष नागरगोजे यांची मागणी मान्य करत लगेच शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून मनसे शेतकरी नेते संतोष नागरगोजे यांचे संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.