Home वरोरा मोवाडा गावात भीषण पाणी टंचाई, महिलांचा पाण्यासाठी टाहो.

मोवाडा गावात भीषण पाणी टंचाई, महिलांचा पाण्यासाठी टाहो.

पिजदुरा ग्रामपचायतचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर,

वरोरा प्रतिनिधी :-

पिजदुरा ग्रामपचायत अंतर्गत येणाऱ्या मोवाडा येथे पाण्याची भीषण टंचाई येथील महिलांसाठी डोकेदुखी ठरली असून त्यांना दैनंदिन गरजेपुरते सुद्धा पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत च्या प्रशासनाकडे टाहो फोडला आहे. दरम्यान गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे नवीन बोरिंग करिता ग्रामपंचायत सत्ताधारी यांनी पाठपुरावा केला नसल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

मोवाडा गावात काही वार्डात पाण्याची मुबलकता असली तरी अर्धा गांव पाण्यासाठी जणू भटकंती करत आहे. अशातच पाण्याचा समतोल राखला गेला नसल्याने एकाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय ही बाब समोर येत आहे. याबाबत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी तातडीनं या पाणी प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा संवर्ग विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घ्यावी लागेल असा इशारा येथील महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here