Home चंद्रपूर राष्ट्रवादी, तुलसीनगर, वृंदावन नगरातील रस्त्याची दुरवस्था

राष्ट्रवादी, तुलसीनगर, वृंदावन नगरातील रस्त्याची दुरवस्था

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  येथील तुकुम प्रभाग क्रमांक एक अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रवादी व तुलसीनगर परिसरातील काही रस्ते सध्या चिखलमय झाले असून, त्यावरून साधे चालणेही कठीण झाले आहे. अनेकवेळा नागरिक घसरूनही पडत आहेत. रस्त्यातील चिखल आणि खड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म,न,पा, प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

नवीन असलेल्या या प्रभागामध्ये म,न,पा, प्रशासनाने अद्यापही पाहिजे त्या सोयी-सुविधा पुरविलेल्या नाहीत. काही ठिकाणी मनयाला सिमेंट रस्ते तयार केले आहेत. मात्र तेही योग्य दर्जाचे नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वृंदावन नगर येथील सिमेंट रस्त्याचे तर बांधकाम अवघ्या काही महिन्यातच वाट लागल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, त्याच्या पुढे काय झाले हे अजून पर्यंत कळालेले नाही.दरम्यान,काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तुळशी नगरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचले आहे. तर काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. या चिखलातून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. सध्या नगरसेवक नसल्याने नागरिकांनी थेट म,न,पा, प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर एक दोन ठिकाणी मुरूम टाकून म,न,पा, प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र, यातून काहीही साध्य झाले नसून किमान चालण्यासाठी तरी रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, सध्या माजी नगरसेवकांनीही या प्रभागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनि केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here