Home महाराष्ट्र अखेर शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप.

अखेर शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप.

अजित पवार यांच्या बंडखोरीची वाट पाहण्यात मंत्रिमंडळ विस्तार  रखडलं होता, अखेर मुहूर्तावर झालेल्या विस्तारत कुणाच्या वाट्याला कोणती खाती यांची यादीच झाली जाहीर.

मुंबई :-

अखेर प्रदीर्घ काळानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप आज झाले आहे. शिंदे फडणवीस सरकार चा मंत्रिमंडळ विस्तार का होत नव्हता यामागे काही तर्कवितर्क लावल्या जातं होते मात्र आता राष्ट्रवादी चे अजित पवार यांच्यासाठी हा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता हे स्पष्ट झाले आहे.

कुणाकडे कोणती खाती ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल,
पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.

विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा. तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

(सार्वजनिक उपक्रम वगळून),

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम.

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम अन्न व –

अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा, औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.

शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण,

बंदरे मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता.

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here