अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
भारत :- इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले आहे.आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान आज प्रक्षेपित करण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान – 3 विकसित करण्यात आले. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान – 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे.
चंद्रावर उतरण्याचे ठिकाण
69.367621 दक्षिण
• 32.348126 पूर्व
4 किमी बाय 2.4 किमीचे क्षेत्र
चांद्रयान- 3 चे वजन व ऊंची किती आहे.
LVM 3-M4 रॉकेट
उंची 43.5 मीटर
वजन 642
चांद्रयान- 3 शोध मोहिमेचा कालावधी
• एक चांद्र दिवस म्हणजे
(पृथ्वीवरील 14 दिवस )