Home महाराष्ट्र राजकीय :- मनसेचं इंजिन जोडल्याशिवाय भाजपचं महाराष्ट्र मिशन फेल?

राजकीय :- मनसेचं इंजिन जोडल्याशिवाय भाजपचं महाराष्ट्र मिशन फेल?

भाजपच्या लोकसभा निवडणुकीत कित्तेक जागा डेंजर झोनमध्ये, शिंदे अजित पवार गटाचं जनमत धोक्यात ?

न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रात मनसे हा पक्ष लहान असला तरी नव्या पिढीतल्या तरुण तुर्क युवकांचा हा पक्ष आहे, तरुणांना राजसाहेब ठाकरे यांचे मोठे आकर्षण आहे, कारण त्यांच्या ओजस्वी भाषणातून राज्याच्या परिस्थितीचा वेध घेऊन सत्ताधारी यांचा जो ते समाचार घेतात त्यामुळे तरुणांच्या मनात राजसाहेब ठाकरे विषयी एक आपुलकी निर्माण होतं असतें, त्यांचे रोखठोक असलेले भाषण व राज्याच्या विकासाचा त्यांच्याकड़े असलेला विकास आराखडा आहे, अशातच सर्व राजकारणी जिथे स्वतःच्या पक्षाचा विचार करून युत्या आघाड्या करतात व ऐन निवडणुकीच्या वेळी कोलांटउड्या घेत राजकारणाचा चिखल करतात तिथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा मर्द गडी कशाचीही पर्वा न करता मराठी माणसासाठी व हिंदुत्वसाठी लढतो आणि सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वळवतो, दरम्यान त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकी स्वतःचे उमेदवार जरी उभे केले नव्हते तरी त्यांचा “लाव रे व्हिडीओ.” हा अभिनव प्रयोग अख्ख्या भारतात गाजला होता व मोदी शहा यांना त्यांनी महाराष्ट्रात घाम फोडला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन-तीन वर्षात बरच काही घडलय. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलय. नवीन युत्या-आघाड्या आकाराला आल्या. आता आणखी एक नवीन युती आकाराला मनसे च्या माध्यमातून समोर येऊ शकते आणि ती भाजप ला हवी आहे, कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून खरी शिवसेना ही आमचीच आहे असा जो दावा केला तो महाराष्ट्रातील जनतेला पटला नाही, शिवाय राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांनी जे बंड केलं ते सुद्धा राज्यातील जनतेला पचलं नाही त्यामुळे भाजपला शिंदे आणि अजित पवार यांच्या मध्यमातून “अबकी बार चारसो पार” आणि “महाराष्ट्र मिशन 45” हा नारा महाराष्ट्रात यशस्वी होणे शक्य नाही, कारण खुद्द त्यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व्हेत त्यांना जास्तीतजास्त 26 जागाच मिळू शकतात किंबहुना त्याहीपेक्षा कमी जागावर त्यांना समाधान मानावं लागेल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे हिंदुची आणि मराठी माणसाची खरी ताकत ही मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून भाजपला मिळू शकते, या वस्तुस्थितीला धरून भाजपने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना दिल्लीला बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली व लोकसभेत मदत मागितली असल्याचे बोलल्या जातं आहे, महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा फायरब्रँड नेता जो हिंदुत्ववादी व मराठी अस्मिता जोपसणारा आहे तो जर आपल्याकडे आला तर खऱ्या व बनावट शिवसेनेची काहीएक आवश्यकता भाजपला भासणार नाही ही वस्तुस्थिती कदाचित भाजप श्रेष्टींना कळली असावी आणि म्हणूनच मनसेचे इंजिन जोडल्याशिवाय भाजपचे महाराष्ट्र मिशन पूर्ण होऊ शकणार नाही याबद्दल ते सजग झाले आणि त्यांनी मनसेला टाळी देत महायुतीत आफर दिली असावी अशी शक्यता आहे.

मनसे भाजपा महायुतीत आली तर काय होईल?

देशात भाजपची अवस्था आता बिकट होतं चालली आहे, 2019 ला जे बहुमत त्यांना मिळाले ते अनेक राजकीय पक्षाच्या मतविभाजनामुळे मिळाले आहे, मात्र आता इंडिया आघाडी होऊन भाजपचे सगळे राजकीय विरोधक एकाच मंच्यावर आल्याने भाजपाला यावेळी 272 चा मॅजिक आकडा पार करणे पाहिजे तेवढे सोपी नाही, यावेळी ईव्हीएमचा खेळ पण विरोधक हाणून पाडू शकते त्यामुळे लोकसभेची एकेके जागा भाजपला महत्वाची आहे, महाराष्ट्रात भाजपला जिंकायचे असेल तर मनसेच्या किमान 4 ते 5 टक्के मतदार असणाऱ्या मनसेला सोबत घेणे भाजप ला आवश्यक आहे, किमान मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथे मनसेचा जो प्रभाव आहे त्या ठिकाणच्या जागा मनसेच्या साथीने भाजप जिंकू शकते, अशातच मनसे भाजप महायुतीत आली तर मनसेचे फायरब्रँड नेते राजसाहेब ठाकरे यांचे निवडणूकीच्या प्रचार सभेतील भाषण हे भाजपच्या उमेदवाराला ताकत मिळवून देऊ शकते, एकीकडे भाजपला गाड्या पाठवून लोकं सभेला आणावे लागते मात्र राजसाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकं स्वतःहून येतात त्याचा फायदा पण भाजप उमेदवाराला होऊ शकतो, अर्थात दोन जागा मिळणाऱ्या मनसेला भाजप च्या 30 जागावर मनसे प्रभाव पाडू शकतो त्यामुळे मनसेचं इंजिन जोडल्याशिवाय भाजपचं महाराष्ट्र मिशन कठीण असल्याने भाजपला मनसेची साथ हवी एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here