Home वरोरा ब्रेकिंग :- तर सत्ताधारी महायुती उमेदवारांच्या विरोधात सभा घेऊन सरकारचा खोटारडेपणा समोर...

ब्रेकिंग :- तर सत्ताधारी महायुती उमेदवारांच्या विरोधात सभा घेऊन सरकारचा खोटारडेपणा समोर आणू.

चंद्रपूर जिल्हा शेतकरी कर्जमाफी संघर्ष समिती शाखा वरोरा भद्रावतीच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून इशारा.

वरोरा :-

राज्यातील महायुती च्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या काळात 2017 ला जी कर्जमाफी झाली त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पाच हजार च्या वर शेतकरी वंचित राहिले, दरम्यान 2018 पासून यासाठी शेतकरी पायपीट करून कर्जमाफी मिळावी म्हणून संघर्ष करत आहे, पण महायुतीच सरकार कुठलीही दाद देत नाही अशी परिस्थिती दिसल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, बैलबंडी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले एवढेच नव्हे तर हिवाळी अधिवेशनात (2023) च्या काळात टेमुर्डा येथे 12 डिसेंबरला रस्ता रोको आंदोलन केले, दरम्यान त्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने पासून वंचित शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली खरी, पण 26, 27 फेब्रुवारी ला झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी करिता निधीची तरतूद केली नाही त्यामुळे शेतकरी संतापले आहे, जे आश्वासन महायुतीचे नेते सभागृहात देतात मात्र त्याची अमलबजावणी होतं नसेल व विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा याकडे कानाडोळा करत असेल तर मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का? असा प्रश्न निर्माण होतं आहे, दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेचे उमेदवार आहे व तेच सन 2017 च्या कर्जमाफी च्या वेळी अर्थमंत्री होते त्यामुळे त्यांनी आमच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लवण्यासंदर्भात लेखी आश्वासन द्यावे अन्यथा चंद्रपूर जिल्हा शेतकरी कर्जमाफी संघर्ष समिती शाखा वरोरा भद्रावती तर्फे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरोशात सभा घेऊन सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा उघड करू असा इशारा पालकमंत्री तथा भाजपा लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना काल दिनांक 19 मार्च ला वरोरा तालुक्यातील भटाळा येथे त्यांच्या सचिवाद्वारे दिलेल्या निवेदनातून दिला आहे, यावेळी वरोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण सन 2023-24 च्या चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, हातात आलेले सोयाबीन गेले, कापसाला भाव नाही आणि सरकारची मदत सुद्धा नाही त्यामुळं शेतकरी गळ्याला फास लावण्याच्या स्थितीत पोहचले आहे. असे असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असतांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली होती, त्यापासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपर्यंत केली नाही, त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान जाहीर करून सुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दिनांक 12 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले, त्यापूर्वी बैलबंडी मोर्चा, ठिय्या आंदोलन यासाठी करण्यात आले होते, परंतु सरकारने वेळोवेळी याबाबत घोषणा करून सुद्धा शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही आणि हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबाबत तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सन 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते, परंतु त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळी झाली नव्हती, त्यामुळे या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही,

एका वर्षात 127 शेकऱ्यांनी केल्या आत्महत्त्या, जबाबदर कोण?

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सन 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफिची घोषणा केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना आंनद झाला होता व येणाऱ्या 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर राज्य सरकार बजेट करतील अशी आशा होती, मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत काहीही निर्णय झाला नाही व शेतकऱ्यांच्या भावनेशी सरकारने छळ केला, या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांकडून बैंक वाले सक्तीची वसुली करत आहे पण शेतकऱ्यावर अगोदरच अस्मानी सुलतानी संकटात उभे पीक वाया गेले त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणामुळे मार्च 2023 ते मार्च 2024 दरम्यान जवळपास 127 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व आता बैंक कडून सक्तीची वसुली केली जातं असल्याने पुन्हा शेतकरी आत्महत्या कारण्याच्या मानसिकतेत आहे, त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी पासून बंचित शेतकऱ्यांना काय ग्वाही लेखी देता व आमचे प्रश्न मार्गी लावता याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे अन्यथा चंद्रपूर जिल्हा शेतकरी कर्जमाफी संघर्ष समिती आपल्या विरोधात जिल्हाभर सभा घेऊन आपला सरकारचा खोटारडेपणा उजेडात आणेल असा इशारा निवेदनातून सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here