Home चंद्रपूर लक्षवेधक :- तर लोकसभेचे येईल धक्कादायक निकाल?

लक्षवेधक :- तर लोकसभेचे येईल धक्कादायक निकाल?

सोलापूर व माढा लोकसभेचा प्रयोग देशात झाल्यास ईव्हीएम होणार हद्दपार.

न्यूज नेटवर्क :-

देशात ईव्हीएम विरोधात होतं असलेला आक्रोश आणि भाजपच्या माध्यमातून निवडणूक आयोग ईव्हीएमचा वापर कारण्यावर ठाम असल्याने दुसरा पर्याय काय? हा प्रश्न निर्माण झाल्याने आता चारसे पेक्षा जास्त उमेदवार जर निवडणूक रिंगणात उभे राहतील तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर दुसरा पर्याय राहणार नाही, अर्थात आता हा प्रयोग करणार कोण? याबद्दल चर्चा होतं असतांना मराठा समाजाने यावेळी पुढाकार घेऊन सोलापूर आणि माढा लोकसभा क्षेत्रात अनुक्रमे 500 व 1000 उमेदवार उभे करण्याचा अभिनव उपक्रम राबविल्या जाणार आहे, त्यामुळे हा प्रयोग देशातील सर्वच लोकसभा क्षेत्रात केल्यास ईव्हीएम हद्दपार होईल असे संकेत आहे.

मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे अध्यादेश लागू न करता मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी ५०० तर माढ्यासठी एक हजार उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्यात येत आहे. सर्व जातीधर्मातील पाठिंब्याने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठा समाजाने सुरू केला आहे.

राज्य सरकारने सकल मराठा समाजाची सगेसोयरे अधिसूचना पारित करून अध्यादेश लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो सकल मराठा बांधवांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने मराठा समाजात नाराजी आहे. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून सकल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण कोर्टात टिकणारे नसून राज्य सरकारने दिलेले आरक्षण फसवे असल्याचा दावा सकल मराठा समाजाकडून केला जात आहे. ते आरक्षण मान्य नसल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह देशांमध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये बहुसंख्य उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय गरजवंत सकल मराठ्यांनी घेतला आहे. अशातच राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शनासाठी शिफारस केली आहे. प्रत्येक गावांतून उमेदवार यादी जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच या निवडणुकीमध्ये काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous articleसनसनिखेज:- शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्या लढाईत तिसरा उमेदवार कांग्रेस देणार?
Next articleराजकीय :- मनसेचं इंजिन जोडल्याशिवाय भाजपचं महाराष्ट्र मिशन फेल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here