Home चंद्रपूर सनसनिखेज:- शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्या लढाईत तिसरा उमेदवार कांग्रेस देणार?

सनसनिखेज:- शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्या लढाईत तिसरा उमेदवार कांग्रेस देणार?

ते कोण आहेत संभावित उमेदवार, कांग्रेस चा गड राखण्यास कोण आहे सक्षम? 

चंद्रपूर :-

चंद्रपूर लोकसंभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजप कडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी देऊन भाजप ने आपला प्रचार सुद्धा सुरु केला आहे, परंतु कांग्रेसच्या अंतर्गत लढाईत शेवटी उमेदवार कोण असेल? यावर संभ्रम कायम आहे, दरम्यान लोकसभेसाठी संभावित उमेदवार म्हणून पुढे आलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाच्या स्थानिक नेतावर आरोप केला की “माझ्या पतीचा त्यांनी जीव घेतला व माझा सुद्धा ते जीव घेऊ शकतात पण मी तो जीव जाऊ देणार नाही.” तो नेता म्हणजे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आहे, असा त्यांचा आरोप होता, महत्वाची बाब म्हणजे शिवानी वडेट्टीवार ह्या विजय वडेट्टीवार च्या कन्या लोकसभेसाठी इच्छुक आहे, त्यामुळे धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा कांग्रेस अंतर्गत लढा सुरु आहे असे दिसत आहे, पण आश्चर्यांची बाब अशी आहे की आमदार प्रतिभा धानोरकर यांना ऐन लोकसभा निवडणूकीच्या वेळीच हा मुद्दा काढण्याची का गरज होती? आणि यामुळे त्या काय साध्य करणार आहे हे कळायला मार्ग नसून कांग्रेस ला इथे जिंकण्याची नामी संधी असतांना स्वतःच्या लोकांसोबतच जर ताशेरे ओढले जातं असतील तर मग निवडणूकीच्या रनधुमाळीत शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी ते एकमेकांना पाडण्याचा मंसुबा ठेऊन असेल व त्यात कांग्रेस चा उमेदवार पक्षांतर्गत कुरघोडीमुळे पडेल असे संकेत आहे, त्यामुळे कांग्रेस च्या वरिष्ठ पातळीवरून तिसऱ्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल अशी चर्चा सुरु आहे.

चंद्रपूर लोकसभा कोण गाजवणार? हा प्रश्न मतदारांमध्ये चर्चीला जातं असला तरी बलाढ्य असणाऱ्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासमोर आव्हान उभे करणारा कांग्रेस चा सक्षम उमेदवार कोण? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, मागील वेळी ऐन बारा दिवसात कांग्रेस ने प्रचार यंत्रणा सांभाळून जो विजय मिळवला तसा विजय कांग्रेस ला यावेळी मिळेल का? याबाबत शंका आहे कारण पक्षात गट तट व अंतर्गत मतभेद यामुळे कांग्रेसची वोटबैंक असली तरी त्यामध्ये विभाजन होण्याची दाट शक्यता आहे, दरम्यान शिवानी वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या परस्पर लढाईत कांग्रेस तिसऱ्या उमेदवाराचा विचार करत आहे, तो तिसरा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, त्यामध्ये कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, पूर्व जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, पूर्व जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे इत्यादी नावाचा विचार कांग्रेसच्या निवडणूक कोर कमेटी मध्ये होण्याची शक्यता आहे, मात्र आमदार विजय वडेट्टीवार हेच यामध्ये महत्वाची भूमिका निभाऊ शकतात, कारण मागील लोकसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांच्याच नियोजनात बाळू धानोरकर यांना विजय मिळाला होता आणि आता त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता हे राज्याच पद असल्याने त्यांना या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मिळू शकते त्यामुळे कांग्रेस च्या अंतर्गत गोटात जरी शांतता असली तरी विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून या लोकसंभा क्षेत्रात कांग्रेसला विजय मिळवून देण्याची रणनीती त्याची सुरु असल्याचे बोलल्या जातं आहे,

अन्यथा कांग्रेस निष्ठावंत दुसरा मार्ग पत्करतील?

जिल्ह्यात खरे तर मोजके कांग्रेसी सोडले तर बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्याचा मोठा भरणा आहे, मात्र जे सदैव कांग्रेसचा झेंडा घेऊन आहेत त्यांना चांगली वागणूक दिल्या जातं नाही अशी ओरड होतांना दिसत आहे, ऐन वेळेवर आलेले कार्यकर्ते पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणि निष्ठावंत बाजूला हा प्रकार निष्ठावंताचता मुळाशी घाव घालणारा असल्याने कांग्रेस च्या अंतर्गत वादात ते यावेळी वेगळा विचार करणार का? हा प्रश्न गंभीर बनला आहे, अर्थात जर निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारीच मिळाली नाही आणि त्यांना विचारले गेले नाही तर अनेक कांग्रेस कार्यकर्ते दुसरा मार्ग पकडून पक्षाला रामराम करणार असल्याच्या चर्चा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here