Home चंद्रपूर मुलाच्या जन्मदिनी रक्तदान करणारा पिता रक्तदाता हा कसा असावा? ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण

मुलाच्या जन्मदिनी रक्तदान करणारा पिता रक्तदाता हा कसा असावा? ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  मुलाच्या जन्मदिनी रक्तदान करणारा पिता ते त्याच मुलाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करणारा पिता
हो, वरील ओळ वाचल्यास आपणास आश्चर्य वाटत असेल,पण ही एक दुःखद कथा आहे,एका नियमित रक्तदान करणार्या पित्याची..एक रक्तदाता हा कसा असावा? ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण या निमित्ताने.
आज दिनांक १४.०७.२०२३ रोजी श्री. जितेंद्र मशारकरजी या रक्तदात्याने विक्रमी ६८ व्या वेळी आपल्या मुलाच्या स्वर्गीय कुशल याच्या ८व्या जन्मदिनी (प्रथम जयंती) रक्तदान केले. जितेंद्र जी हे नियमित रक्तदाता आहेत, कुशलच्या जन्मापासून त्याच्या जन्मदिनी दि.१४ जुलै रोजी जितेंद्र जी हे दरवर्षी रक्तदान करत होते,परंतु या पित्याचे दुर्दैव असे की गेल्यावर्षी मुलाच्या जन्मदिनाआधीच दि.‌ ०८.०७.२०२२ स्वर्गीय चिरंजीव कुशलचे झोपेत असताना अवघ्या सातव्या वर्षी निधन झाले. दरवेळी मुलांच्या जन्मदिनी रक्तदान करणारा पिता आज मुलाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करेल असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल.
आपले आभाळाएवढे दु:ख बाजूला सारून घरात दुखवटा असून देखील गेल्यावर्षी‌ दि. १४ जुलै रोजी पित्याने थेट रक्त केंद्र गाठले आणि रक्तदान करते झाले. माफक अपेक्षा एकच की एखाद्या दुर्देवी रुग्णाचे रक्ता अभावी प्राण जाऊ नये. आज ६८ व्या वेळी रक्तदान करून दरवर्षी मुलाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा रक्तदात्यास मानाचा मुजरा!
रक्तदात्यांना अजून कसली प्रेरणा पाहिजे? आज मानवाने अगदी भूगर्भापासून ते चंद्रापर्यंत प्रगती केली, इतकेच काय दुधाची पावडर तयार केली,परंतू आजही रक्ताची कुठलीही प्रयोगशाळा वा रक्ताची पावडर तयार करू शकला नाही, प्राणी रक्तदान करू शकत नाहीत, फक्त मानवच रक्तदान करून दुसर्या मानवाचा जीव वाचवू शकते.रक्तदान केल्याने एखाद्या रुग्णाचे प्राण वाचतात. तसेच त्याचा आशीर्वाद व शुभेच्छा देखील मिळतो यासारखा असीम आनंद कुठलाच नाही.
रक्तदानाचे अनेक फायदे आहेत. एका युनीट रक्तदानाने आपण ३ रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. गरजू रुग्णास या रक्तदानाने जीवनदान मिळते. रक्तदानामुळे नवीन रक्त पेशींची निर्मिती होते रक्तदानानंतर शरीर लगेच नव्या रक्तपेशींची निर्मिती करते त्यामुळे रक्तदात्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नियमित रक्तदान केल्याने रक्ताभिसरण संस्था सुरळीत राहते,हृदयरोगाचे प्रमाण कमी होते,हेमोक्रोमेटोसिस हा रक्तामध्ये अतिरिक्त लोहा मुळे होणारा विकार रक्तदानामुळे दूर राहतो. रक्तदानामुळे रक्तातील लोह घटकाचे प्रमाण नियंत्रित झाल्याने कर्करोग होण्याचे जोखीम कमी होते. ठराविक पातळीपर्यंतच रक्तात लोह हवे अन्यथा कर्करोगाला ते कारणीभूत ठरू शकतात. लोहाचे प्रमाण जर जास्त तर आरोग्याचे इतर समस्या निर्माण होतात, हे संतुलन रक्तदानामुळे राखता येते.
रक्तदानामुळे लोहाचे अतिरिक्त प्रमाण कमी झाल्यामुळे हृदय व यकृताचे आरोग्य राखण्यास मदत होते. अनेक जण भरपूर अन्न सेवन करतात त्यातील ठराविक भागच उपयोगी पडतो उर्वरित भागाचा संचय अनारोग्यकारक चरबीचा रुपात यकृत स्वादुपिंड हृदयाच्या वाहिन्यात जमा होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येते. रक्तदान ही सोपी आणि अल्पावधीत पार पडणारी प्रक्रिया आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.तेव्हा रक्तदात्यांनो पुढे यावे आणि रक्तदान करावे.
ब्रिद वाक्य-रक्त द्या प्लाझ्मा द्या जीवनाचा हा वाटा वारंवार द्या.
श्री. पंकज पवार
समाजसेवा अधीक्षक
रक्तकेंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपर.

Previous articleघुग्घूस नगरपरिषद चे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये समाविष्ट करा – आ. किशोर जोरगेवार
Next articleधारीवालमधील कामगार अधिकारी व कंत्राटदार अशा एकूण १५२ जणांनी केले विक्रमी रक्तदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here