Home चंद्रपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघा कडून “सुंदर माझा ओपन स्पेस ” स्पर्धेसाठी...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघा कडून “सुंदर माझा ओपन स्पेस ” स्पर्धेसाठी समिती गठीत

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  दि, २४,०७,रोज सोमवारला ” सुंदर माझा ओपन स्पेस स्पर्धा ” वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघा कडून आणि माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम बनवण्यात आली. आणि या टीम दारे या स्पर्धेत सर्वानुमते भाग घेतला आहे. या वेळी यात कोणताही मतभेद नको व सर्वांनी मिळून मिसळून एकत्रित होवून काम कोणत्या प्रकारे करायचे आणि आपल्या वार्डाचा क्रमांक कसा आणायचा या उद्देशाने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघाने एक नवीन समिती स्थापन केली व या समितीचे उद्घाटन माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार व त्यांच्या अर्धांगिनी मंजूश्री कासनगोट्टूवार यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी द्वारका नगरी राऊत लेआऊट तुकूम चंद्रपुर येथील सर्व स्वच्छता प्रेमी उपस्थितीत होते. या वेळी या समितीला एक नविन नाव देऊन घोषणा करण्यात आली. “ओपन स्पेस विकास समिती” या समितीचे अध्यक्ष बबन अनमुलवार,उपाध्यक्ष,संतोष राऊत,सचिव, रामराव सदाशिव धारणे
कोषाध्यक्ष,देवराव बोबडे,आरोग्य प्रमुख, दयाराम नन्नावरे, योग शिक्षिका, शालिनी भोग,शुभांगी अनमुलवार, सौंदर्यीकरण प्रमुख,भाऊराव विठोबाजी, पुंडलिक रोडे, अशोक भिडेकर,ओपन स्पेस देखभाल प्रमुख, भास्करराव इसनकर, भास्करराव भोकरे, पांडुरंग पंढरे,
जनजागृती व प्रसिध्दी प्रमुख, रामभाऊ कुंभारे, आनंदराव मांदाडे, व समस्त स्वच्छता गट सदस्य महिला व पुरुष उपस्थित होते.

Previous articleचिंतनिय:- समृद्धी टोलनाका मनसेने फोडल्या प्रकरणी कां सुरू झालं महाराष्ट्रात राजकारण?.
Next articleचंद्रपूर शहरातील पुरावर माजी नगरसेव पप्पू देशमुख यांच्या मनपा प्रशासनावर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here