Home चंद्रपूर मा.ना. विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्याने तुकुंम मध्ये वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न

मा.ना. विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्याने तुकुंम मध्ये वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर, यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ शिवनेरी उद्यान समिती तसेच श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणीत) अध्यात्मीक सेवा केंद्र तुकुम चंद्रपूर कडुन वृक्षरोपन कार्यक्रम घेण्यात आला. मा.ना. सुधिर मुनगंटीवार यांना जन्मदिवसानिमित्य वृक्षारोपण करून शुभेच्छा देण्यात आल्या. सुधिर  मुनगंटीवार यांनी आपल्या कारकीर्दीत विविध क्षेत्रातील अनेक कामे केली आहे.त्यांच्या या कारकिर्दीमुळे त्यांनी स्वतःची लोकपुरुष म्हणून एक अनोखी ओळख निर्माण केली आहे.

अनेक वर्ष सुधिरभाऊ यांनी पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभरात झाडे लावून उपक्रम राबविला होता. त्याच अनुषंगाने  श्री स्वामी समर्थ बालोद्यान तसेच निमवाटीका उद्यान रयतवारी कॅलरी चंद्रपूर येथे वाढदिवसाची भेट म्हणून वृक्षरोपण करून शुभेच्छा देण्यात आल्या.माजी नगरसेवक, भाजपा महानगर महामंत्री सुभाषभाऊ कासनगोटटुवार यांच्या अध्यक्षेते खाली श्रीमान संजयजी वैरागडे क्षेत्रीय महाप्रबंधक चंद्रपूर क्षेत्र यांचा प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सपंन्न झाला. या वेळी समिती सदस्य तथा बंधु आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here