Home चंद्रपूर आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवसा दिनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ...

आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवसा दिनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ योगा ग्रुप तर्फे वृक्षारोपण

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  🕉️ परमपूज्य स्वामी रामदेव महाराज व आचार्य बाळकृष्ण जी यांना कोटी कोटी प्रणाम.🙏
आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवस ०४ ऑगष्ट हा जडीबुटी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आज दिनांक ०८,०८,२०२३ ला सकाळी ०७,००,,वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ योगा ग्रुप कुमरे लेआउट छत्रपती नगर तुकूम चंद्रपूर येथे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार माजी व महामंत्री भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी अध्यक्षस्थानी  विजय चंदावार, जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान, व शरद व्यास, संघटन मंत्री रमेश ददगाळ, सह संघटन मंत्री सुधाकरराव श्रीपूरवार, भारत स्वाभिमान, मधुकरराव राजुरकर, जिल्हा सहप्रभारी चंद्रपूर जिल्हा, प्रकाश कासार्लेवार, जिल्हा संवाद प्रभारी आणि गुरूदेव सेवा मंडळाचे आत्राम, सौ रेखाताई कापटे, हरिदासजी कापटे अध्यक्ष तथा ता.सोशल मिडीया प्रभारी व ईतर सदस्य गण आणी लाॅ कॉलेज योगा ग्रुप तुकूम चंद्रपूर चे ठावरी सौ अक्षताताई देवाळे, व ईतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात वड, पिंपळ , कडुलिंब सीताफळ जांभूळ कवठ, हनुमान फळ इत्यादी २५, प्रकारचे वृक्ष रोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश ददगाळ, जिल्हा उप प्रभारी भारत स्वाभिमान, यांनी केले तर हरिदासजी कापटे, अध्यक्ष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ योगा ग्रुप कुमरे लेआउट छत्रपती नगर यांनी आभार प्रदर्शन केले वृक्षारोपण झाल्यावर अल्पोपहारचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. या कार्यक्रमात सुभाष कासमगोट्टूवार यांना शाल श्रीफळ देऊन योगा ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले.

Previous articleक्राईम ;- खांबाडा जवळ जुन्या वैमनस्यातून ट्रक ड्राइवरवर तलवारीने प्राणघातक हल्ला.
Next articleमाजी नगरसेवकासह वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघातील टीमने केले सतत पाच ते सहा तास स्वच्छतेचे काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here