Home वरोरा क्राईम ;- खांबाडा जवळ जुन्या वैमनस्यातून ट्रक ड्राइवरवर तलवारीने प्राणघातक हल्ला.

क्राईम ;- खांबाडा जवळ जुन्या वैमनस्यातून ट्रक ड्राइवरवर तलवारीने प्राणघातक हल्ला.

निखिल साखरकर ,अश्पाक शेख व पट्टेवाला जगदीप सींग यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल.

वरोरा प्रतिनिधी :

दिवसेंदिवस तालुक्यात क्राईम वाढत असून दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या 11.00 च्या दरम्यान खांबाडा येथील मोनाली बार जवळ दारूच्या नशेत पांढऱ्या रंगाच्या कार मधून आलेल्या निखिल साखरकर ,अश्पाक शेख व पट्टेवाला जगदीप सींग यांनी ट्रक (क्रमांक MH34-BZ1644) ड्रायव्हर प्रमोद थेरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यामध्ये त्यांच्या कानाला रक्त लागून दुखापत झाली यावेळी ट्रक कंडक्टर नरेंद्र थेरे हा सुद्धा उपस्थित होता.

दरम्यान प्रमोद थेरे यांच्या कंपनीतील अशोक राजूरकर व मारोती बोकडे हे ट्रक घेऊन आले व थांबले त्यावेळी निखिल साखरकर यांनी त्याच्या कार मधून तलवार काढली तर जगदीश सींग यानी खंजर काढून प्रमोद थेरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली व अशोक राजूरकर यांना सुद्धा तलवारीने वार करण्याच्या उद्देशाने पाठलाग केला असता त्याच्या करंगळी ला दुखापत झाली. आता आपल्याला जिवानीशी ठार करणार या भीतीने प्रमोद यांनी ट्रकवर चढून गाडी सुरू केली व पळ काढला त्यानंतर अशोक राजूरकर हा सुद्धा त्यां पाठोपाठ आला. त्यानंतर त्यांनी 112 वर फोन करून तक्रार केली असता पोलीस आले व त्यांनी चौकशी केली व वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल करण्याचे सांगितले.

त्यांच्या तक्रारी वरून निखिल साखरकर ,अश्पाक शेख व पट्टेवाला जगदीप सींग यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल झाले असून डीबी पथकाचे उपपोलीस निरीक्षक किशोर मित्तलवार यांनी आरोपींना अटक केली आहे. रात्रीच्या वेळी तलवारीने जुन्या वैमनस्यातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या निखिल साखरकर ,अश्पाक शेख व पट्टेवाला जगदीप सींग यांच्यावर प्रतिबंध कारवाई सुद्धा करावी अशी मागणी फिर्यादी प्रमोद थेरे यानी केली आहे.

Previous articleलक्षवेधक :- त्या आदिवासी महिलेने पोलीस स्टेशन मध्येच कसे केले विष प्राशन ?
Next articleआचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवसा दिनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ योगा ग्रुप तर्फे वृक्षारोपण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here