Home वरोरा लक्षवेधक :- त्या आदिवासी महिलेने पोलीस स्टेशन मध्येच कसे केले विष प्राशन...

लक्षवेधक :- त्या आदिवासी महिलेने पोलीस स्टेशन मध्येच कसे केले विष प्राशन ?

महाराष्ट्र पोलिसांच्या “सद्रक्षणाय् खलनिग्रहनाय” या ब्रीद वाक्यांचा वरोरा पोलीस प्रशासनाला का पडला विसर ?

लक्षवेधक :-

वरोरा पोलीस स्टेशन च्या आवारात जिल्ह्याच्या अतिरीक्त पोलीस अधीक्षक असतांना व परत दोन आयपीएस अधिकारी असतांना त्यांच्या समोर पिडीत आदिवासी महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या काहीच कसे लक्ष्यात आले नाही हा गंभीर प्रश्न आहे. खरं तर पोलीस प्रशासन त्यां पिडीत महिलेला आत्महत्या करण्यापासून पराव्रुत्त करण्यासाठी चार तास कौन्सिलिंग करत होते त्याचा इम्पॅक्ट म्हणजे पिडीत महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं म्हणावं कां ? हा प्रश्न उपस्थित होतं आहे. गुन्ह्यांपासून पराव्रुत्त करण्याची जबाबदारी पोलिसांची असतांना त्यांच्यासमोर गुन्हा घडतं असेल तर मग उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हायला नको कां ?असा प्रश्न पण आहेच. कारणं पोलिसांच्या हातून एखादा आरोपी निसटून जातो तर त्यां पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होते तर मग पोलीस स्टेशन मधे गुन्हा घडताना पोलीस उपस्थित होते तर मग पोलिसांवर पण कारवाई व्हायला हवीच असा संताप सर्वत्र व्यक्त होतं आहे. दरम्यान विष प्राशन करणाऱ्या पिडीत आदिवासी महिलेची प्रक्रुती बरी असल्याची माहिती आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. पण वरोरा पोलीस स्टेशन मध्ये या ब्रीद वाक्यांचा योग्य आदर केला जातं आहे का ? हा जर प्रश्न जनतेला विचारला तर जवळपास 80 टक्के जनता म्हणेल की नक्कीच नाही. यांचा अर्थ वरोरा पोलीस प्रशासनाकडे जे लोक न्याय हक्क मागण्यांसाठी येतात त्यांना न्याय मिळतं नाही, उलट त्यांचा अपमान केला जातो, नव्हे त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचे प्रकार इथे नित्याचच भाग झाला आहे. त्यातच API निलेश चवरे खाकी वर्दीतील गुंडगिरी करणारे, महिलांबाबत अभद्र शब्दांचा वापर करून त्यांचे चारित्र्य हनन करणारे व फिर्यादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात बंद करण्यासाठी उपद्व्याप करणारे आहे, आश्चर्याची बाब म्हणजे अशा नालायक पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस अधिकारी पाठराखण करत असेल तर मग न्याय मागायचा कुणाकडे ? हा प्रश्न येथील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

खांबाडा येथील एका आदिवासी महिलेवर अत्त्याचार झाल्यावर तिने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली पण आरोपी हा खांबाडा येथे अवैध देशी दारू विक्रीचा धंदा करतो व त्यांचेकडून API चवरे हप्ता वसुली करत होते त्यामुळं त्याला वाचविण्यासाठी API चवरे यांनी आरोपी विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल तर केला मात्र आरोपीकडून 40 हजारांची लाच घेऊन त्याला पोलीस कस्टडीत न घेता परस्पर न्यायालयात हजर करून जामीन मिळवून देण्यास सहकार्य केले होते असा महिलेचा आरोप आहे. दरम्यान पिडीत महिलेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचविण्यासाठी API चवरे यांनी आरोपीला फिर्यादी महिलेविरोधात खोटी तक्रार देण्यास सांगून महिलेवर पण गुन्हा दाखल केला जेणेकरून तिच्यावर झालेल्या अत्त्याचार च्या गुन्ह्याची तीव्रता कमी होईल. आता आपल्याला न्याय मिळत नाही असा विश्वास पटल्याने पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी दिल्या पण न्याय मिळत नसल्याने तिने पत्रकार परिषद घेऊन आरोपींना अटक करा व API चवरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा मी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिनांक 6 ऑगस्ट सोमवारला विष घेऊन आत्महत्या करेंन असा इशारा दिला होता. या गंभीर इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनाने तिच्या हालचालीकडे लक्ष देऊन तिला समजविन्याचा प्रयत्न केला खरा पण तिचे समाधान झाले नाही कारणं खरा खलनायक हा API चवरे होता आणि त्यांनीच खरेतर या प्रकरणाला चिघळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं पिडीत महिलेची मागणी होती की API चवरे यांच्यावर कारवाई करा. पण पोलीस प्रशासनानं चवरे यांना वाचविण्याच्या नादात पिडीत महिलेला विष पिण्यास विवश केले ही खरी परिस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here