Home वरोरा ब्रेकिंग :- शेवटी API चवरेच्या अन्यायामुळे आदिवासी पिडीत महिलेने पोलीस स्टेशन परिसरातच...

ब्रेकिंग :- शेवटी API चवरेच्या अन्यायामुळे आदिवासी पिडीत महिलेने पोलीस स्टेशन परिसरातच घेतले विष.

चार दिवसांपूर्वी दिला होता इशारा. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्युशी झुंज.

आरोपीकडून 40 हजारांची लाच मागितल्याचा धडधडीत पुरावा असल्याने API चवरे वर गुन्हा दाखल करण्याची केली होती मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

आदिवासी महिलेवर झालेल्या अत्त्याचारा विरोधात तिने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आरोपीला अटक करा व आरोपींकडून पैसे घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असलेल्या API चवरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा मी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन विष घेऊन आत्महत्या करेन अशा प्रकारचा इशारा चंद्रपूर व वरोरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनाला दिला होता पण तरीही पोलीस प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई न केल्याने पीडित आदिवासी महिलेने वरोरा पोलीस स्टेशन परिसरातच जवळपास सायंकाळी 5.30 च्या दरम्यान  विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे तिची प्रक्रुती गंभीर असल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

आदिवासी महिलेवर एका व्यक्तींनी केलेल्या अत्त्याचाराविरोधात त्या महिलेने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा API चवरे यांनी आरोपी कडून 40 हजारांची लाच घेऊन त्याला वाचविण्यासाठी त्या महिलेवरचं गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालवला असल्याने ती महिला संतापली व तिने जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी दिल्या तेंव्हा कुठे आरोपी वर गुन्हे दाखल करण्यात आले होते पण आरोपींना अटक न करता सरळ न्यायालयात पेश केले होते अशी माहिती आहे. दरम्यान त्या आदिवासी महिलेची मागणी होती की आरोपींना अटक करा व API चवरे यांनी ज्या पद्धतीने आरोपी कडून पैसे घेऊन माझ्यावर अन्याय केला त्यांचेवर कारवाई करा पण पोलीस प्रशासन असे करायला तयार नसल्याने शेवटी महिलेने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here