Home चंद्रपूर माजी नगरसेवकासह वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघातील टीमने केले सतत पाच ते...

माजी नगरसेवकासह वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघातील टीमने केले सतत पाच ते सहा तास स्वच्छतेचे काम

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दि.०८,०८,२३, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार यांच्या सहकार्याने सोमवारला वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघ तुकूम द्वारकानगरी येथे ” सुंदर माझ्या ओपन स्पेस ” चे औचिक साधून सत्तत पाच ते साहा तास काम करून रेकॉर्ड बवण्यात आले कारण या संघामध्ये जास्तीत जास्त वयोवृद्ध लेडीज व जेन्ट्स आहे. इतके वयोवृद्ध असताना सुद्धा पाच ते सहा तास काम करणे म्हणजे आश्चर्यच परंतु म्हणते ना की सोबत चांगले लोक असले की काम सुद्धा चांगले होत असतात. तसेच या तुकूमध्ये माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार असतात आणि यांचे काम म्हणजे वेगळेच आणि यांनी आज वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघ धारका नगरी येथे येऊन स्वच्छताचे काम हाती घेतले आणि या संघाने सुद्धा येथील नगरसेवकाला मदत केली आणि बघता बघता स्वच्छतेच्या  कामांमध्ये हे टीम इतकी व्यस्त झाली की यांना टायमाचा वेळ सुद्धा भासला नाही आणि जेव्हा यांचे पूर्णपणे स्वच्छताचे आणि सुंदरतेचे काम पूर्ण झाले तेव्हा यांनी टाईम बघीतला तर माहिती पडला की सतत पाच ते सहा तास यांनी नॉन स्टॉप काम केले. या संघांदारे चंद्रपारातील युवकांना स्वच्छते बद्दल खूप चांगला संदेश दिलेला आहे. या वेळी इथे विविध कामे करण्यात आली.त्यात स्लोगन लिहणे ,विटांच्या रांगाना रंगरंगोटी करणे ,तुळसीचे व्रुंदावन सुसज्ज करणे ,व्रुक्ष संवर्धन करणे, महाराजांजची जन्मकुटी सारविणे ,चुल टाकणे ,कुटिचा परिसर खराट्याच्या समुहाने स्वच्छ करणे ,परिसरातील सर्व झाडांच्या बुंध्याना रंगरंगोटी करणे ईत्यादी कामे करण्यात आली. व नंतर ०६,३० ते 07,00 पर्यंत सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.या वेळी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघांमधील ३९, सदस्य उपस्थित राहून सहकार्य करण्यात मदत करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here