Home चंद्रपूर सीमा मेश्राम परिचारिका मृत्यूप्रकरण: आंदोलनाचा इशारा

सीमा मेश्राम परिचारिका मृत्यूप्रकरण: आंदोलनाचा इशारा

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका सीमा मेश्राम यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. मात्र, त्यांच्यावर वेळेवर योग्य उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. दरम्यान, त्या स्वतः वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध सुटी घेऊन घरी गेल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांवर दोषारोपण कारवाईची मागणी होत आहे. डॉक्टरांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर कारवाई केल्यास सामूहिक रजा आंदोलन करणार, असे इशारावजा पत्र येथील महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने वैद्यकीय शिक्षणमंत्र्याला पाठविले आहे.

पत्रानुसार, १७ ऑगस्ट रोजी परिचारिका सीमा मेश्राम ९:१५ वा. अतिदक्षता विभाग येथे भरती झाल्या. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार केला. दरम्यान, दुपारी ३:५० वा सीमा मेश्राम यांना विक्की

अशोक भेंडले यांनी खासगी दवाखान्यात स्वतःच्या जबाबदारीवर चालत घेऊन नेलें.

यावेळी विक्की अशोक भेंडले यांनी डीएएमएवर (वैद्यकीय सल्याचे विरुद्ध सुटी घेणे) स्वाक्षरी केली. यामध्ये स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णाला खासगी दवाखान्यात नेत आहोत, दरम्यान, ‘रुग्णाच्या जिवाला काही कमी जास्त झाल्यास येथील हॉस्पिटल प्रशासन, डॉक्टर, सर्व नर्स व इतर कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत’, असे लिहिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तरीसुद्धा डॉक्टरांना वेठीस धरणे चुकीचे आहे.

डॉक्टरांवर कारवाई झाल्यास सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here