Home चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा समस्या तुमच्या आवाज आमचा माजी नगरसेवक सचिन भोयर

चंद्रपूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा समस्या तुमच्या आवाज आमचा माजी नगरसेवक सचिन भोयर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानगर पालिकेवर आयुक्तांचा प्रशासक राज बसलेला आहे. निवडणुका झाल्या नाही कुणीही नगरसेवक पदावर नाही त्यामुळे चंद्रपूर शहर हे समस्याच्या माहेर घर बनत चाललेल आहे. कारण आता शहरात सर्वत्र घाण वाढतं चालेल आहे. जागो जागी कचरा वाढत आहे नाले, नाल्या, साफसफाई होत नसल्यामुळे भरून वाहत आहे.

इतकेस नाही तर चंद्रपुरातील घंटागाडी वाले सुद्धा आता घरोघरी येणे बंद झालेले आहे. कारण चंद्रपुरात सध्या प्रशासन राज सुरू आहे. आणि चंद्रपुरातील नागरिकांना सांगतात की पर्यायी योजना म्हणून मनपा घनकचरा उचलण्यासाठी गाड्या लावण्यात येणार म्हणून जेव्हा पर्याय योजना म्हणून गाड्या लावतात तर पर्यायी योजना म्हणून कचरा टॅक्स पण माफ करावा हे मात्र प्रशासनाला सुचत नाही कारण चंद्रपुरात प्रशासन राज्य सुरू आहे.

आणि आता तर इतकी समस्या वाढत चाललेली आहे की नाले, नाली  तर सोडाच पणचंद्रपुरातील रस्ते आता रस्ते नाही तर रस्यत्यात खडे आहे की खड्यात रस्ता समजणे कठीण झाले आहे. आणि त्यात मनपाचे कामगार जागोजागी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे खोदककाम करून उरलेले रस्ते सुद्धा खड्डेमय करत आहे. म्हणूनच आता चंद्रपुरातील नागरिक सध्या अति जास्त परेशान झालेली आहे.

तरीसुद्धा चंद्रपुरातील समस्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकाना मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 18,10,2023 रोजी सकाळी 11,00 वाजता महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धडक देण्याचे योजीले आहे. तरी सर्व नागरिक शहर,पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिकांनी, युनियन पदाधिकारी कामगार मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

     चंद्रपुरातील नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना माहिती

शक्य असल्यास सकाळी 10 :30 वाजता माजी नगरसेवक सचिन भोयर यांच्या कार्यालय, निवासस्थानी यावे जेणेकरून सर्वांना एकत्रित मिळून महानगरपालिकेला धडक मोर्चा नेता येईल .आपला सचिन भोयर शहर अध्यक्ष, मनसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here