Home चंद्रपूर चंद्रपूर शहरात जीवघेण्या अपघाताची मालिका सुरुच

चंद्रपूर शहरात जीवघेण्या अपघाताची मालिका सुरुच

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

रामनगर पोलिस स्टेशन 🚨 समोर आज पुन्हा एक मोठा अपघात
शहरातील वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा ⛔🚦

चंद्रपूर  :-  शहरात जीवघेने अपघाताची मालिका सुरूच एकही दिवस असा नाही की चंद्रपुरात अपघात होणार नाही मग तो छोटा असो या मोठा पण अपघात तर होणे हे चंद्रपुरात सध्या सोपा विषय झाला आहे. आतास काही दिवसा अगोदर जनता कॉलेज जवळील रिलायन्स पेट्रोल पंप समोर एका शिक्षिकेच्या अपघात झाला आणि त्याच्या काही दिवसा अगोदरच जनता कॉलेज चौकात सुद्धा अपघात झाला इतकेच नाही तर आत्ताच दोन-तीन दिवसा अगोदर वरोरा नाक्यावरही सुद्धा अपघात झाला आणि हे नुसते अपघात नाही तर ऑन द स्पॉट मुत्यु झालेला आहे. मग हा अपघात आहे की जीव घेण्याचे प्लॅनिंग कारण चंद्रपुरातील ट्रॅफिक पोलीस व पोलीस प्रशासन करत तरी काय आहे.

फक्त सिग्नल लावून वसुली करायची की काय आपल्या सिग्नल जवढ उभे होऊन गरीब नागरिकांन कडून वसुली करायचा धंदा खोलेला आहे.? की काय दोन पोलीस एका सिग्नल जवढ असतात रस्त्याच्या दोन्ही साईडला एक एक पोलीस असायला पाहिजे तर दोन्ही पोलीस एकाच जागी एखाद्या झाडाखाली किंवा छत्री खाली बसून थंडी हवा खात गप्पा मारत बसत असतात नाहीतर गोरगरीबाच्या वसुलीमध्ये व्यस्त असतात आणि याच कारणाने अपघाताचे प्रमाण वाढले तर नाही ना ?

अशे विचार सध्या चंद्रपुरातील नागरिकांना येत आहे. आणि आज दि, 20,11,2023, ला पुन्हा एक अपघात रामनगर पोलिस स्टेशन 🚨 समोर झाला आणि नुसता अपघात नाही तर या अपघातात पण सदर वक्तीचा जागीच मुत्यु झाला आणि इथे सुद्धा तुम्हाला तेच बघायला मिळणार ट्राफिक पोलीस अपघात किंव्हा कमि वयातील गाडी चालकांना, ट्रिपल सीट असलेल्याना रोखण्यासाठी नाही तर ट्राफिक पोलीस असतात पण ते फक्त नागरिकाकडून वसुली करण्यासाठी

कारण हे ट्राफिक पोलीस जिथे पण तुम्हाला दिसतात फक्त वसुली करण्यात व्यस्त असतात किंवा एखाद्या झाडाखाली नाही तर ठेल्याजवळ आपल्या थंड हवेमध्ये छत्रीखाली बसून असतात चंद्रपुरातील याच कारणामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढत चाललेले आहे. असा अंदाज सध्या चंद्रपुरातील नागरिकांना पडतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here