Home चंद्रपूर चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरात वाघाच्या हल्ला 1 ठार

चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरात वाघाच्या हल्ला 1 ठार

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

बाबुपेट परिसरातील वाघांचा बंदोबस्त लवकरात लवकर करा अन्यथा वनविभाग विरोधात आंदोलनाच्या इशारा मनसे शहर अध्यक्ष पियुष धुपे

चंद्रपूर  :-  राज्यातील ताडोबा जंगलात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार दि, 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावलेला आहे.

बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार केले. शनी मंदिर परिसरातील तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेची माहिती मिळताच मनसेचे शहर अध्यक्ष पियुष धुपे

यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती दिली व मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली, मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे. वनविभागाशी काही वेळ चर्चा केल्यावर तपास पूर्ण करण्यात आला व वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन पियुष धुपे यांना मिळाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहे, ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे. या दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करीत या परिसरात लवकरात लवकर वनविभागाने पिंजरे लावावे अशी मागणी बाबुपेट येथील मनसे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी केली व येत्या काही दिवसांत या वाघांचा बंदोबस्त न केल्यास वनविभागा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पियुष धुपे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here