Home चंद्रपूर चिंताजनक :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांची अवैध उत्खनन प्रकरणी चलाखी ?

चिंताजनक :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांची अवैध उत्खनन प्रकरणी चलाखी ?

माफियांना वाचविण्यासाठी चेक तिरवंजा परिसर सोडून तिरवंजा मोकासा चे उत्खनन मोजमाप करण्याचे आदेश?

चंद्रपूर :-

जिल्ह्यातील जवळपास सर्वच अधिकारी यांनी अवैध रेती व गौण खनिज उत्खनन करण्याच्या कामात आपली छूपी संमती देऊन गौण खनिज माफियांच्या गौण खनिज चोरित आपला सहभाग नोंदवला असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे, दरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यासाठी जी जिल्हास्तरीय समिती स्थापन केलेली होती, त्या समितीचा जणू फज्जा उडाला आहे. अशातच भद्रावती तहसीलदार सोनवणे, नायब तहसीलदार भान्दककर, मंडळ अधिकारी व स्थानिक तलाठी यांच्या सहकार्याने तिरवंजा परिसरात हजारो ब्रॉस अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात आले ते समोर येऊ नये म्हणून तहसीलदार सोनवणे यांनी माफियांना वाचविण्यासाठी चेक तिरवंजा परिसर सोडून तिरवंजा मोकासा चे उत्खनन मोजमाप करण्याचे आदेश दिले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भद्रावती तालुक्यातील तिरवंजा परिसरात तत्कालीन काँग्रेस चे चंद्रपूर तालुका अध्यक्ष शामकांत थेरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो ब्रॉस गौण खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला असल्याने याबाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करण्यात यावे व हे उत्खनन करणाऱ्या जेसीबी व पोकलॅन मशीन आणि वाहतूक करणारे हायवा ट्रक जप्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती, दरम्यान उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी याबाबत भद्रावती तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना अवैध गौण खनिज मोजमाप करण्याचे आदेश दिले होते. अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात संबंधित अधिकारी यांनी माफियाकडून पैसे घेतल्याने त्यांना वाचविण्यासाठी तहसीलदार सोनवणे यांनी तिरवंजा परिसरातील चेक तिरवंजा येथे सर्वात जास्त गौण खनिज उत्खनन झाले असतांना तो परिसर सोडून चेक तिरवंजा परिसरातील गौण खनिज उत्खनन मोजमाप करण्याचे आदेश दिले आहे. यावरून तहसीलदार सोनवणे यांचा या अवैध गौण खनिज उत्खनन करण्याच्या कामात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर येतं आहे. दरम्यान एखादी तक्रार तहसील कार्यालयात आल्यास ती बाब लगेच त्या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना माहित होते यावरून अवैध गौण खनिज माफिया व तहसीलदार सोनवणे यांचे काय संबंध आहे हे लक्षात येते, त्यामुळे या प्रकरणात अवैध गौण खनिज माफिया जेवढे दोषी आहे त्यापेक्षा जास्त तहसीलदार सोनवणे व त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहे त्यामुळे यांच्यावर पण कारवाई व्हायला हवी अशी मागणी होत॑ आहे.

वनविभागाच्या जमिनीतून सुद्धा अवैध गौण खनिज उत्खनन?

भद्रावती तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी वनविभागाच्या प्रतिबंधित परिसराला लागून असलेल्या महसूल च्या जमिनीतून गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी दिली असतांना वनविभागाच्या जमिनीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याची माहिती आहे, खरं तर वनविभागाच्या परिसरातील महसूल जागेवर गौण खनिज उत्खननाची परवानगी देणेच गैर आहे मात्र कुठलीही शहानिशा नकरता ही परवानगी देण्यात आली आणि वनविभागाच्या जमिनीतून सुद्धा गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याची शंका असल्याने या संदर्भात वनविभागाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आल्याचे कळते.

Previous articleग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आमचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार
Next articleशिवनगर वासियों की जल समस्या हल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here