Home भद्रावती सनसनिखेज :- तहसील कार्यालयातून ट्रक चोरी, तहसीलदार सोनवणे गोत्यात ?

सनसनिखेज :- तहसील कार्यालयातून ट्रक चोरी, तहसीलदार सोनवणे गोत्यात ?

तहसीदाराच्या नावाने कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन ट्रक सोडल्याचा आरोपी चा खुलासा, कर्मचाऱ्यांनी दाखवले तहसीलदाराकडे बोट.

भद्रावती प्रतिनिधी :-

एकीकडे तिरवंजा येथील अवैध गौण खनिज चोरी प्रकरण गाजत असतांना व त्या प्रकरणात भद्रावती तहसीलदार सोनवणे, नायब तहसीलदार भांदककर आणि मंडळ अधिकारी पटवारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता बघता भद्रावती तहसील कार्यालयातून चक्क ट्रक चोरून नेण्याची सनसनिखेज घटना काल समोर आली असुन तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार सोनवणे यांच्या नावाने ट्रक मालकाकडून तब्बल 60 हजार रुपये घेतले व ट्रक सोडला असल्याची माहिती आहे पण तहसील कार्यालयात ट्रक गायब असल्याने तहसील कर्मचारी गजानन क्षीरसागर यांनी भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये ट्रक चोरीला गेल्याची तक्रार केल्याने केस क्रमांक 607/23 कलम 379, 34 अन्वये रांजण मनिराम कांबळे, जीवन सुरेश गायकवाड, परमेश्वर गंगाराम चौघुले व सुरेश तेलंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मागील 7 नोव्हेंबर ला सदर ट्रक पकडल्या नंतर ट्रक मालक तो ट्रक चुकीने पकडला व त्या ट्रक मधील खनिजांची रॉयल्टी होती पण गाडी पन्चर झाल्याने वेळ चुकली अशी माहिती देत असतांना त्यांचे काहीही नऐकता तहसीलदार सोनवणे यांनी ती गाडी तहसील कार्यालयात लावली पण ट्रक सोडण्याच्या वाटाघाटी सुरू होत्या त्यामुळे तहसील कर्मचारी सुरेश तेलंग यांच्या माध्यमातून तहसीलदार सोनवणे यांच्याशी बोलणे होऊन 60 हजारात ट्रक सोडण्याची कबुली झाल्याने तो ट्रक तहसील कार्यालयातून सोडण्यात आला. त्यात सुरेश तेलंग या तहसील कर्मचारी यांच्या उपस्थितीत ट्रक सोडण्यात आला पण दुसरा तहसील कर्मचारी गजानन क्षीरसागर यांनी पोलिसात तक्रार दिल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असुन तहसीलदार सोनवणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत॑ आहे. ज्याअर्थी तहसील कर्मचारी तहसीलदार यांच्या नावाने पैसे मागतो याचा अर्थ तहसीलदार याचा त्या व्यवहारात सहभाग आहे हे स्पष्ट होते, विशेष म्हणजे तहसील कर्मचारी सुरेश तेलंग यांनी मी घेतलेले 60 हजार रुपये तहसीलदार सोनवणे यांना दिल्याची कबुली केल्याने या प्रकरणात तहसीलदार सोनवणे सामील असल्याचे दिसतं आहे. कारणं एखादा ट्रक तहसीलदार यांना न विचारता सोडण्याची ताकत कर्मचारी यांच्यात नसते  त्यामुळे पोलिसांनी तहसीलदार सोनवणे यांच्यावर पण ट्रक चोरीच्या कटात सहभाग असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत॑ आहे. दरम्यान दिवाळी पूर्वी एक ट्रॅक्टर तहसीलदार सोनवने यांनी असाच परस्पर सोडला असल्याची चर्चा होती, त्यामुळे या प्रकरणात सुद्धा तहसीलदार सोनवणे याचा सहभाग असल्याचे दिसतं आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान तहसीलदार सोनवणे यांच्या बाबतीत अनेक प्रकरणे आता उघड होत॑ असुन लवकरच मोठा भूकंप पण होऊ शकतो अशी विश्वसनीय माहिती आहे.

 

Previous articleशिवनगर वासियों की जल समस्या हल
Next articleआमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमात निवासस्थानी भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here