Home चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र, 1 चे सहाय्यक आयुक्त म्हणून संतोष गाडगीलवार यांनी स्वीकारले...

महानगरपालिका झोन क्र, 1 चे सहाय्यक आयुक्त म्हणून संतोष गाडगीलवार यांनी स्वीकारले पदभार

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  महानगरपालिका अंतर्गत, झोन क्र,1, संजय गांधी मार्केट मधील मा, सहाय्यक आयुक्त म्हणून संतोष गाडगीलवार यांनी स्वीकारले पदभार. पदभार स्वीकारताच तात्काळ झोन क्र, एक मधील संपूर्ण संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली व या मीटिंगमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना झोन क्र, 1 अंतर्गत असलेल्या सर्व वार्डातील रोड वरील घाण,कचरा,व झेंडी स्वच्छता मोहीम राबवून जबाबदारी स्वीकारावेत आवर्जून सांगण्यात आलेले आहे.

की वार्ड मधील रोडवरील आपआपले काम जबाबदारी घेऊन पार पडावेत, कर्तव्यदक्ष राहून घाण,कचरा,झेंडी मधील कचरा,रस्त्यावरील कचरा,वार्डातील नाल्या संपूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर दिसायला पाहिजे व कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार यायला नाही पाहिजे,

आलेल्या तक्रारीला लवकरात लवकर मार्गी लावून त्या तक्रारदाराचे समाधान कारक कार्य पार पाडण्यात यावेत,अश्या प्रकारचे समाधान कारक सर्वाने कार्य करून जनतेला सेवा द्यावीत,
असा आदेश देण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मा, गाडगीलवार यांचे आदेशाचे पालन करण्याचे मान्य केले,म्हणजेच आता झोन क्र, 1 हा स्वच्छ आणि सुंदर दिसेल हे मात्र नक्की.

Previous articleगणपती बाप्पा मोरया’ या जयघोषात जात-पात विरहित समाजाचे वर्णन – ना.सुधीर मुनगंटीवार
Next articleना.सुधीर मुनगंटीवार करणार नागरिकांच्या तक्रारीचे निवारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here