Home चंद्रपूर खळबळजनक :- ठाणेदार अंबोरे फिरताहेत सट्टाकिंग हाफिज च्या कार ने ?

खळबळजनक :- ठाणेदार अंबोरे फिरताहेत सट्टाकिंग हाफिज च्या कार ने ?

ये रिश्ता क्या कहलाता है ? च्या जोरदार चर्चा, अवैध व्यावसायिकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांची दोस्ती कशाच्या बळावर?

ब्रम्हपुरी/चंद्रपूर

जिल्ह्यात जे अवैध व्यवसाय चालतात त्या व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ असल्याशिवाय ते व्यवसाय चालूच शकत नाही हे कुणीही छातीठोकपणे सांगेल, पण जिल्ह्यातील काही पोलीस विभागाचे अधिकारी यांनी ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीद वाक्याला हडताळ फासून स्वतःच्या स्वार्थासाठी अवैध व्यावसायिकांना खुली सूट दिल्याचे विदारक चित्र समोर येतं येतं आहे, अशातचं आता चक्क घुग्गुस, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा, शहर ते ब्रम्हपुरी असा प्रवास करणारे ठाणेदार अंबोरे यांनी वणी येथील कुख्यात सट्टाकिंग हाफिज सेठ यांच्या नावाने आरटीओ मध्ये रजिस्टर असलेली MH 29 AR8855 ही खासगी कार वापरली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान ही माहिती तेंव्हा उजेडात आली जेंव्हा अंबोरे यांनी ब्रम्हपुरी येथील रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा पाठलाग त्या हाफिज सेठ च्या कारने केला.

ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधाकर अंबोरे हे गुंड प्रव्रुत्तिचे असल्याने त्यांच्यावर अनेकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत तर काहींनी न्यायालयात दाद मागून त्यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले असल्याने ते नेहमीच विवादात असतात, घुग्गुस येथे नौशाद शेख व कलवलं यांना मारहाण केल्याची घटना असो की चंद्रपूर येथे एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला मारहाण असो आणि आता ब्रम्हपुरी येथील ट्रॅव्हल्स ड्राइवरचे काठीने डोके फोडण्याचा प्रकार असो अंभोरे यांची विक्रुत मानसिकता व स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची गुंड प्रव्रुत्ति यामुळे त्याच्या अधिकार क्षेत्रातील पोलीस स्टेशन परिसरात सर्वसामान्य जनतेत मोठी दहशत असायची पण अवैध व्यावसायिकांचा वेगळा सन्मान ते करायचे त्यामुळे ते ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या त्यांच्या विचारांच्या उलटे वागायचे आणि पोलीस खात्याला बदनाम करायचे त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांना तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तडीपार करायला हवे होते पण तसे झाले नाही कारणं जिथे कायदा सुव्यवस्था राखणारी व्यवस्थाच कायदा पायदळी तुडवत असेल तर मग यावर नियंत्रण ठेवणार कोण ? हा गंभीर प्रश्न उभा ठाकला असुन यामुळे सर्वसामान्य लोंकाना न्याय मिळतं नाही ही खरे तर लोकशाहीची शोकांतिकाचं म्हणावी लागेल.

ये रिश्ता क्या कहलाता है?

एका कुख्यात सट्टाकिंग असलेल्या हाफिज रहमान शेख ची कार जर ठाणेदार अंबोरे वापरत असेल तर मग ठाणेदार यांचे त्या सट्टाकिंग सोबत काय संबंध असतील हे न बोललेच बरे, कारण ही बाब समोर आल्यानंतर कुणीही म्हणेल की पोलीस अधिकारी आणि सट्टाकिंग जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यासारखे एकमेकांची कार वापरत असेल तर मग अवैध व्यावसायिक व पोलीस यांच्यावर “ये रिश्ता क्या कहलाता है” ही पुन्हा एक धारावाहिक काढायला हवी का ? यावर मंथन व्हायला हवे.

दरम्यान ट्रॅव्हलच्या ड्राइवरने मारहाणीची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन मध्ये दिली असता ती तक्रार तेथील उपस्थित स्टेशन डायरी अधिकारी यांनी घेतली नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या कडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप अंभोरे यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाल्याची माहिती नसून स्थानिक गुन्हे शाखेत असतांना त्यांनी गुंडगिरी दाखवून अनेकांना मारहाण व स्वतःच्या अधिनस्थ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देऊन एकाधिकार गाजवला असल्याने त्यांची एल सी बी तून उचलबांगडी करण्यात आली होती मात्र आता सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांनी दाखवलेली गुंडगिरी त्यांच्या उर्वरित जीवनाची राखरांगोळी करणारी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here