Home चंद्रपूर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-  सावली ता,-महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात.आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.*

*महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*

*अभिवादन करते प्रसंगी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,माजी सभापती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार,नगर पंचायत सावलीच्या अध्यक्षा सौ.लताताई लाकडे,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,सेवा सोसायटी राईसमिल अध्यक्ष मा.मोहन गाडेवार नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.अंतबोध बोरकर,मा.प्रितम गेडाम,मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.साधना वाढई, सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती शिंदे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,शहर उपाध्यक्ष मा.विलास दुधे व मा.देवराव मोहुर्ले तसेच मा.पंकज सुरमवार,मा.सुनील ढोले,मा.गजेंद्र मानापुरे,मा.बादल गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

Previous articleनागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज ६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी
Next articleसरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here