Home चंद्रपूर संडे मार्केटवर मनपा अधिकाऱ्याची धडक कारवाई, आठवडी बाजार बंद; 200 दुकानांचे साहित्य...

संडे मार्केटवर मनपा अधिकाऱ्याची धडक कारवाई, आठवडी बाजार बंद; 200 दुकानांचे साहित्य जप्त

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या महानगरपालिकातील आठवडीबाजार (संडे मार्केट) वर अचानक धडाकेबाज कारवाई केल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मनपाने एकदोन नव्हे तर तब्बल 150 ते 200 दुकानांचे अस्थायी दुकान लावण्याचे साहित्य जप्त केले. यात टेबल, खुचीं, ठेले व इतर साहित्याचा समावेश आहे. ही कारवाई शहर पोलिस व वाहतूक पोलिसांच्या मदतीने करण्यात आली. आयुक्त विपीन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त संतोष गडगीलवार आणि सचिन माकोडे यांनी मोर्चा सांभाळला. 2 मोठी वाहने आणि 20 मनपा कर्मचान्यांच्या चमूने महत्त्वाची भूमिका बजावली मनपाच्या बेधडक कारवाईची चर्चा शहरात सुरू आहे. चौकचौकात जमलेल्या अतिक्रमणावर असाच बडगा उगारल्या जाईल का? असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

मनपाने सुचविली कायमची पर्यायी जागा पण…

अनधिकृत संडे मार्केटचा त्रास स्थानिक व्यापारी व जनतेला होऊ लागल्यावर काही व्यापारी न्यायालयात गेले तर नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या. याची दखल घेत मनपाने संडे मार्केट असोसिएशनल्ला महाकाली मंदिर बैल बाजार व दरगाह मैदान नागपूर रोड या 2 सुरक्षित जागा सुचविल्या. या दोन्ही जागा त्यांना मान्य नसल्याने संघर्षाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकाची व व्यापाऱ्यांची होती तक्रार

काही वर्षापूर्वी अचानक रविवारी आठवडी बाजाराला सुरुवात झाली बाहेरून आलेल्या काही व्यापाऱ्यांनी बाजार लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही संख्या 70 व्या घरात होती पण ती आज 200 पर्यंत पोहोचल्याने वाहतुकीला अडथळा होऊ लागला. हेच नव्हे तर रघुवंशी कॉम्प्लेक्ससमोरील रस्ता दुकान लावून बंद करण्याचे धाडस बाहेरील व्यापा-यानी केले आणि प्रकरण तापले. रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या व्यापा-यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने आठवडे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले, परतु, पुन्हा व्यापाऱ्यांनी दुकान थाटले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने बेधडक कारवाई केली.

बैठकीतील निर्णयाला व्यपाऱ्यांनी दिला होता ‘खो’

आठवडी बाजाराचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आयुक्तांनी संडे मार्केट असोसिएशन वाहतूक पोलिस व शहर पोलिसांची बैठक घेऊन पुढील दिशा निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार या व्यापाऱ्यांची सोय मनपाने केली. व्यापाऱ्यांना जयंत टॉकीज ते न्यु इंग्लिश हायस्कूल दरम्यान बाजार भरवायचा होता परंतु झाले उलट, मुख्य रस्त्यावरच बाजार भरल्याने नागरिकांच्या तक्रारीचा पाऊस पडला, याची दखल घेत महात्मा गांधी चौक ते जयत टॉकीज, जयंत टॉकीज ते जिल्हा सामान्य रुग्णालय या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण रविवारी हटविले.

संडे मार्केट असोसिएशनचे निवेदन

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रविवारी मुख्यरस्त्यावर बाजार भरवण्यात आला परंतु, मनपाने धोबीपछाड देत कारवाई केल्याने संडे मार्केट असोसिएशनने पोलिस अधीक्षका लेखी निवेदन दिले, या निवेदनात त्यांनी पुढील 4 आठवडे न्यायालयाचा निर्णय येत पर्यंत बाजार बंद ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here