Home चंद्रपूर संतापजनक :- चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ताडोबा भ्रमंतीवर,

संतापजनक :- चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ताडोबा भ्रमंतीवर,

हिवाळी अधिवेशनाच्या काळात मोजमजा. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून ऑफर?

चंद्रपूर:-

चंद्रपूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चंद्रपूर महाराष्ट्र विद्युत केंद्राच्या विशेष मदतीने ताडोबा भ्रमंतीवर गेल्याची माहिती आहे. तेथील एका रिसॉर्ट मध्ये त्यांची खास व्यवस्था करून देण्यात आली आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मोठ्या प्रमाणात अधिकारी कामावर रुजू असतात मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हे अधिकारी एक दिवस हिवाळी अधिवेशनाच्या काळातच आपले मोजमजा करण्यात व्यस्त आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान प्रदूषणा संदर्भात येणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी अधिकाऱ्यांना कार्य तत्पर राहावे लागते. अशावेळी कर्तव्यदक्ष अधिकारीच नसल्याने इतर अधिकाऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नांची उत्तरे पाठवी लागत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे प्रदूषण नियंत्रणाचे काम करण्यासाठी नियुक्त केलेले असतात. मात्र, ते स्वतःच प्रदूषणाचे कारण ठरत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या काळात कामावर नसून मोजमजा करण्यात व्यस्त असणे हे गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकारी फोन करत असतात मात्र सदर प्रदूषण नियंत्रण अधिकारी स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून भ्रमंतीवर गेलेले आहेत. येथील एका रिसॉर्ट मध्ये थांबून ते विविध पदार्थांचा पाहुणचार घेत आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी होत॑ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here