Home चंद्रपूर दखलपात्र :- अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी शामकांत थेरे यांच्यावर कारवाईचा फास.

दखलपात्र :- अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी शामकांत थेरे यांच्यावर कारवाईचा फास.

विधिमंडळात मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता. तहसीलदार सोनवणे पण अडकणार ?

चंद्रपूर :-

भद्रावती तालुक्यातील मौजा तिरावंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन करून कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविणाऱ्या शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांविरोधात व त्यांना संरक्षण देणाऱ्या तहसीलदार सोनवणे, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याविरोधात गुन्हे करा व अवैध उत्खनन झाले त्यांचे मोजमाप करून त्यांवर दंड आणि ते गौण खनिज उत्खनन करणाऱ्या मशीन व वाहतूक करणारे ट्रक जप्ती करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपविभागीय अधिकारी वरोरा व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती, दरम्यान सदर जागेतील उत्खनन झाले त्यांचे मोजमाप करण्यात आले, मात्र या संदर्भात तहसीलदार सोनवणे यांनी शामकांत थेरे यांना वाचविण्यासाठी स्वतः आठवड्यात सुट्ट्या घेतल्या व त्यांचेवर कुठलीही दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यास ते टाळाटाळ करत आहे. या दरम्यान हा विषय नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार असल्याची जोरदार चर्चा असुन लवकरच शामकांत थेरे यांच्यावर कारवाईचा फास आवळण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भद्रावती तालुक्यातील मौजा तिरावंजा येथे जवळपास एक किलोमीटर जागेत शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून व प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले व शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला आहे. या संदर्भात मनसेतर्फे उपविभागीय अधिकारी वरोरा व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी आदेश देऊन त्यांचे मोजमाप करण्याचे निर्देश तहसीलदार सोनवणे यांना दिले होते, दरम्यान नायब तहसीलदार भांदककर, मंडळ अधिकारी वाटेकर, तलाठी अनामिका भगत यांनी मौका चौकशी करून गौण खनिज उत्खनन झाले त्यांचे मोजमाप केले, परंतु जवळपास दोन आठवडे लोटून गेल्यानंतर सुद्धा तहसीलदार सोनवणे यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या शामकांत थेरे व त्याच्या सहकार्यांवर दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई केली नाही, त्यामुळे तहसीलदार सोनवणे हे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होते, कारणं जे अवैध उत्खनन झाले त्यात तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पैसे घेऊन उत्खनन करण्याची मूक संमती दिली होती हे स्पष्ट दिसतं आहे. अर्थात कुठलेही अवैध उत्खनन तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संमती शिवाय होत॑ नाही त्यामुळे ते शामकांत थेरे व त्यांच्या सहकार्यांवर कारवाई करू शकत नाही कारणं ते यात सहभागी आहेत हे दिसतं आहे.

चालू हिवाळी अधिवेशनात शामकांत थेरे यांनी या प्रकरणातून वाचण्यासाठी आपली थेरेपी चालवली होती, मात्र त्यासाठी मोठी रक्कम मागितल्या गेली असल्याने त्यांची पुरती गोची झाली, त्यामुळे अगोदरच कुणाही व्यक्तीला मदत करण्याची व स्वतःचा पैसा खर्च करण्याची सवय नसल्याने एवढे पैसे द्यायचे कसे ? हा संभ्रम त्यांना निर्माण झाल्याने त्यांच्यावर विधिमंडळाच्या या अधिवेशनात लक्षवेधी सुद्धा लागू शकते, पर्यायाने अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी शामकांत थेरे व त्याच्या सहकार्यांवर दंडात्मक कार्यवाही व पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल होऊन त्यांच्या पोकलॅन पीसी सह जेसीबी मशीन सह सगळे हायवा ट्रक जप्त होऊ शकते अशी जाणकारांची माहिती समोर येतं आहे. आता या सर्व प्रसंगातून शामकांत थेरे व तहसीलदार सोनवणे स्वतःला कसे वाचवू शकतात याकडे अवैध गौण खनिज क्षेत्रात काम करणारे माफिया डोळे लावून बसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here