Home चंद्रपूर निवड :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी उमेश बोढेकर .

निवड :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी उमेश बोढेकर .

भाजप ने कामगार संघाच्या संयोजकपदी निवड केल्याने कार्यकर्ते व कामगारांना आंनद.

चंद्रपूर :-

भाजप मध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांचे स्वतःचे असे नेतृत्व गुण नसल्याची बाब समोर येत असताना कामगार क्षेत्रात कामगारांना संघटित करून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कामगार नेते उमेश बोडेकर यांच्या कार्याची दाखल घेऊन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी त्यांची निवड कारण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने कार्यकर्ते व कामगारामधे आंनद व्यक्त होतं आहे.

कामगारांचा समस्या व भाजप चे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेशाध्यक्ष कामगार मोर्चा, विजय हरगुडे, प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे, प्रदेश महामंत्री, हनमंत लांडगे, प्रदेश सचिव भास्कर बराते, पूर्व विदर्भ संघटक धनंजय वैद्य, प्रदेश महामंत्री मिलिंद देशपांडे या पदाधिकाऱ्यांचा विशेष उपस्थितीत उमेश बोढेकर यांच्या खांद्यावर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाकरीता भाजप कामगार मोर्चाच्या संयोजकपदी निवड करीत कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्या आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here