Home चंद्रपूर नवरगाव येथे विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबच्या वतीने स्व.बाळुभाऊ लोणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ...

नवरगाव येथे विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबच्या वतीने स्व.बाळुभाऊ लोणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या भव्य रात्रकालीन प्रो कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन केले.

नवरगाव येथे विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबच्या वतीने

स्व.बाळुभाऊ लोणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या भव्य रात्रकालीन प्रो कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन केले.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-शारीरिक पराक्रम, रणनीती आणि सांघिक कार्याचा मेळ असलेला हा एक मनमोहक खेळ आहे. ताकद, चपळता आणि मानसिक कुशाग्रतेचे दर्शन घडवणारा हा खेळ खेळाडूंमध्ये एकता आणि सौहार्द निर्माण करतो. यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. भविष्यात आपल्याही भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करावे यासाठी अशा स्पर्धा नक्कीच मैलाचा दगड ठरतील.

या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष मा.रमाकांतभाऊ लोधे, नगराध्यक्ष स्वप्नीलभाऊ कावळे, स्वातीताई लोणकर, नवरगाव काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुशांतभाऊ बोडणे, सरपंच राहुल बोडणे, दादाजी जन्मतवार, श्रीकांत जी, संजयभाऊ सोनकुसरे, सुभाष शिंदे सर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here