Home चंद्रपूर लायन्स एक्स्पो च्या माध्यमातून लघु आणि घरगुती उद्योगाला चालना मिळेल – आ....

लायन्स एक्स्पो च्या माध्यमातून लघु आणि घरगुती उद्योगाला चालना मिळेल – आ. किशोर जोरगेवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लायन्स एक्स्पोचे उद्घाटन

लायन्स एक्स्पो च्या माध्यमातून लघु आणि घरगुती उद्योगाला चालना मिळेल – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लायन्स एक्स्पोचे उद्घाटन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-स्पर्धेच्या युगात सरकारी नौकरी मिळविणे कठीण झाले आहे. अशात स्वयंरोजगाराकडे आपण वळले पाहिजे. अनेक बचत गटांनी लघु उद्योग सुरु केले आहे. लायन्स एक्स्पो मध्ये या बचट गटांना स्ट्रोल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे लायन्स एक्स्पोच्या माध्यमातून लघू आणि घरगुती उद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
लायन्स क्लबच्या वतीने चांदा क्लब मैदान येथे पाच दिवसीय एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लायन्स क्लब चे प्रांतपाल बालबीर सिंह वीज, डॉ विलास मुळे, शैलेश बागला, घनश्याम दरबार, दिनेश बजाज, राजू भास्करवार, बबलू कोठारी, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, पंकज शर्मा आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, लायन्स क्लबच्या वतीने एक्स्पोचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यात आपण विद्यार्थांमधील कलागुणांना वाव मिळावी यासाठी मंचा उपलब्ध करुन देण्याचे काम केले आहे. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तु विक्रिसाठीही आपण त्यांना स्ट्राॅल दिले आहे. यातून नक्कीच या छोट्या उद्योगांना फायदा होणार आहे. असे आयोजन हे नियमित झाले पाहिजे. आपल्या घरगुती आणि बचत गटांतील महिलांच्या उद्योग वाढीसाठी हे आयोजन वरदान ठरणार असल्याचेही ते या प्रसंगी बोलताना म्हणाले.
लायन्स एक्स्पो च्या शुभारंभ प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माता महाकाली च्या पूजनाने सदर एक्स्पो चा शुभारंभ करण्यात आला. सदर आयोजन ३१ डिसेंबर पर्यंत चालणार असून एक्स्पो मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मंच मिळावा या उद्देशाने विभिन्न स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. एक्स्पो च्या यशस्वीतेसाठी शैलेश दरबार,अजय वैरागडे,विश्वास माधमशेट्टीवार, गोपिकीशन, डॉ अपर्णा सोनवलकर, अनु बागला, अंजु गोयल, पूजा जैन, सुनीता जैन, कविता अग्रवाल, जया सातपुते, लक्ष्मी अग्रवाल, मंजू गोयल, कविता तहीलीयनी, अभिषेक बांगला, निर्मल भंडारी, पंकज खजांची, कोमल मुरारका, सोनल पुगलिया, सोनिया गुप्ता परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here