Home चंद्रपूर सनसनिखेज:- अप्पर जिल्हाधिकारी यांच्या त्या निर्णयाने 1000 कोटींचा रेती घोटाळा.

सनसनिखेज:- अप्पर जिल्हाधिकारी यांच्या त्या निर्णयाने 1000 कोटींचा रेती घोटाळा.

सरकार जमा झालेली रेती, घाट धाराकांना कुठल्या नियमाने दिली याचा सनसनिखेज खुलासा,

2 लाख रुपये 38 रेती घाट धाराकांकडून खनिकर्म अधिकारी नैताम याच्या एजन्ट ने जमा केल्याची चर्चा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

नदी पात्रातून पोकलेनं मशीन ने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती घाट धारकांना अटकावं करणास गेलेल्या गावाकऱ्यांवर गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावर जीवघेना हल्ला घाट धारक व ठेकेदार यांनी केला त्यामुळे त्यांच्यावर एमपीएडी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावी व त्यांना सरक्षण देणाऱ्या व शासन जमा झालेला रेती साठा उचलण्याची बेकायदेशीर परवानगी देऊन शासनाचा 1000 कोटी पेक्षा जास्त महसूल बुडविणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी व इतर महसूल अधिकाऱ्यांची एसआयटी द्वारे चौकशी करून शासन महसूल चोरीत सहभागी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावंर निलंबनाची व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे महसूल मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव राजागोपाल देवरा यांच्यासह विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 38 रेती घाट मागील सन 2022-23 या वर्षात लिलाव झाले असून त्या 38 रेती घाटातुन रेती उत्खनन करण्यात आले, दरम्यान रेती घाटाची उत्खनन करण्याची मुदत ही 10 जून, 2023 होती व रेतीसाठा उचलण्याची मुदत जिल्हाधिकारी या कार्यालयाचे आदेशानुसार ही 30 सप्टेंबर 2023 होती, दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील करारनामा मधील अटी व शर्ती मधील मुद्या क्र. 16 नुसार उत्खनन केलेल्या किंवा काढलेल्या वाळु/रेतीची साठवणूक, लिलाव ज्या अपर जिल्हाधिकारी/जिल्हाधिकारी यांनी केला असेल त्याच जिल्हयात करावी लागेल व त्यासाठी अकृषक परवान्यासह आवश्यक जमीन उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी लिलावधारकाची असेल. वाळु/रेती ठेक्याची मुदत संपण्यापुर्वी ज्या वाळु रेती चे उत्खनन केलेले आहे. त्या वाळूचा / रेतीचा साठा मुदत संपल्यानंतर 10 दिवसात उत्खननाच्या जागेवरुन हलविण्यात आला नाही तर तो शासनाच्या मालकीचा होईल. अशा वाळुच्या / रेतीच्या किंमतीबाबत अथवा मालकीबाबत लिलावधारकास अथवा त्यांच्या ठेकेदारास कोणताही हक्क सांगता येणार नाही किंवा त्याबाबत शासनाविरुध्द दावा करता येणार नाही असे नमूद करण्यात आले होते. दरम्यान अपर जिल्हाधिकारी चंद्रपर यांनी रेती घाट धाराकांना सुद्धा कळवले होते की परवानगी स्थळी असलेला रेतीसाठा माहे 10 ऑक्टोंबर, 2023 पर्यंत हलविण्यात यावा. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत उचल करण्याची किंवा वाहतुक करण्यासाठी दुय्यम वाहतूक पासेस देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. उचल केलेल्या रेतीसाठयाचा हिशोब तहसिल कार्यालय येथे सादर करावा.

वरील आदेश स्वतः अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले असताना त्यानी कुठल्या नियमानुसार रेती घाटावर शिल्लक रेती साठा उचलण्याची परवानगी रेती घाट धाराकांना दिली याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात असून जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांचा वसुली एजंट जो सर्व रेती घाट धारकांकडून वसुली करतो त्यांनी 38 रेती घाट घाट धारकांकडून प्रत्येकी 2 लाख रुपये वसुली करून त्या बदल्यात घाट धारकांना नदी पात्रातून रेती काढण्याची खुली सूट देऊन तब्बल 1000 कोटिपेक्षा जास्त रेती घोटाळा केला असल्याची सनसनिखेज  माहिती समोर येत आहे.

भंडारा पोलिसांनी अवैध रेती चोरट्यावर केलेली कारवाई चंद्रपूर येथे का नाही?

भंडारा जिल्ह्यात पंकज खोटेखाये व कृष्णा खोटेखाये हे दोन रेती माफिया मोठया प्रमाणात नदी पात्रातून रेती चोरीचा धंदा करत होते व प्रशासनातील महसूल अधिकाऱ्यांना मैनेज करून खुलेआम रेती चोरी करत होते याबाबत चंद्रपूर चे उपविभागीय अधिकारी म्हणून काम सांभाळणारे व आता भंडारा तेथील जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना आदेश देऊन पंकज खोटेखाये व कृष्णा खोटेखाये ह्या दोन रेती माफिया विरोधात एमपीएडी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास सांगितले व तशी पोलिसांकडून कारवाई होऊन दोघांना कारागृहात पाठवले तशी कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here