Home चंद्रपूर खळबळजनक :- शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांचा कोट्यावधीचा घोटाळा दडपला?

खळबळजनक :- शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांचा कोट्यावधीचा घोटाळा दडपला?

सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी माहिती अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीत भ्रष्टाचार उघड.

वनविभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याची वरवर माहिती नेहमीच पुढे येतं असते पण सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी वनविभागाचा रोखरेखा यामधील माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी बी के तुपे यांनी कागदोपत्री केलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर आणला आहे.

शिवनी वनपरिक्षेत्रात गवत, पाचोळा कापणे, झुडूप कापणे व तो गोळा करून त्याचा जाळण्यासाठी वापर करण्याचा उपयोग करिता कामाचे कंत्राटं आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था वासरा यांना दिल्याची माहिती व त्यासाठी त्यांना जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त रक्कम त्यांच्या बैंक ऑफ महाराष्ट्र वासेरा बैंक खात्यात जमा केल्याची माहिती सन 2020-21 च्या रोखलेखा च्या दस्तावेज वरून सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ नागरिक मुरलीधर गायकवाड यांनी माहिती अधिकार अंतर्गत मिळवली. दरम्यान आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था वासरा यांनी जे मजूर पुरवठा केल्याची बाब समोर आली असली तरी त्या मजुरांची नोंद शिवनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नोंदवहीत व त्यांचे मोजमाप व अभिलेख उपलब्ध नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारणं जे कामे केली त्यांचे मोजमाप नाही त्यांची अधिक्रुत नोंद नाही व त्यांचे मूल्यांकन नाही टर कुठल्या आधारावर त्या संस्थेच्या बैंक खात्यात वन विभागाने पैसे जमा केले हा गंभीर प्रश्न उभा राहत आहे.

वनपरिक्षेत्र शिवनी च्या सन 2020-21 च्या रोखलेखा मधील नोंदी समोर येऊन त्यामधील रक्कम जवळपास 1 कोटी 68 लाख यापेक्षा जास्त असुन ज्याअर्थी आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था वासरा कडून मजूर वनविभागाच्या कामासाठी पुरवठा करण्यात आले नाही व तशी नोंद रजिस्टर मध्ये नाही मग त्यांच्या नावाने जे चेक त्यांच्या बैंक खात्यात कसे टाकण्यात आले हा मोठा प्रश्न असुन वनपरिक्षेत्र अधिकारी बी के तुपे यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती चा कालावधी जवळ आला असतांना वनविभागात मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी वनविभागाचा या भ्रष्टाचार विरोधात चौकशी करण्यासाठी व दोषी वर कारवाई करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक. उपलोकायुक्त. प्रधान मुख्य वनसंरक्षक व लोकायुक्त मुंबई यांना तक्रारी पाठवल्या पण काहीएक उपयोग झाला नाही उलट सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांच्यावरच खोटा आरोप करून त्यांच्या घरातून कागदपत्र जप्त करून अटक केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणाचा उलगडा भुमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारा होणार असल्याने त्या सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी बी के तुपे यांच्यावर कारवाई निश्चितपणे होईल अशी आशा आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here