Home Breaking News २११ वाहन चालकांना थर्टी फर्स्टची पार्टी पडली २१ लाखांत

२११ वाहन चालकांना थर्टी फर्स्टची पार्टी पडली २१ लाखांत

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  जिल्ह्यात थर्टी फस्ट शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिस तसेच जिल्ह्यातील पोलिसांकडून जिल्ह्याभरात २९ डिसेंबरपासून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवसांत जिल्ह्याभरात तब्बल ५२३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एकट्या थर्टी फस्टला २११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना आता न्यायालयात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

          तीन दिवसांत ५२३ जणांवर कारवाई

पोलिसांनी २९ डिसेंबरपासून मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली. तीन दिवसांत तब्बल ५२३ जणांवर कारवाई करुन तब्बल ५२ लाख 30 हजारांचा दंड ठोठावला आहे.

              सुसाट वाहन चालविणारेही अडकले

आजची तरुणाई जल्लोषात सुसाट वाहन चालविताना दिसतात अशा वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे शांततेत थटर्टी फस्ट पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here