Home Breaking News राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन ग्राम विसापूर येथे २८ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते.
रोज सकाळी योग व प्राणायाम चे धडे स्वयंसेवकांना दिले व त्यांचेकडून प्रात्यक्षिक करून घेतले. योग व प्राणायम आणि त्यांचे फायदे यावर प्रशिक्षण घेण्यात आले. गावात रस्ते, गटारे व नाली स्वच्छता अभियान, रोज परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.

स्वच्छ्ता प्रबोधनाकरिता जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये स्वयंसेवकांनी जयघोष करत हाती प्रबोधन फलक घेत जनजागृती पर नारे दिले. मतदार जनजागृती तथा रस्ता सुरक्षा प्रबोधन करण्यात आले. गावात शैक्षणिक सर्व्हेक्षण करण्यात आले.
सदर शिबिरात विविध उदबोधन वर्ग घेण्यात आले. त्वचा विकार तज्ञ डॉ. प्रकाश रामटेके यांनी स्वयंसेवकांना त्वचा विकराबद्दल मार्गदर्शन केले, संमोहन व समुपदेशन यावर प्रा. हरिभाऊ डोर्लीकर यांनी प्रशिक्षण उपक्रम घेतला. आरक्षण आणि आजचा युवक या विषयावर डॉ. अनिल मोरे यांनी मार्गदर्शन केले. श्री जगदीश नंदुरकर यांनी स्वयंसेवकांना नाट्य प्रशिक्षण दिले असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, नाट्य, एकपात्री, लोककला आणि संगीत वादन, अश्या उपक्रमात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. असे विविध सांस्कृतीक उपक्रम रोज राबविल्या जात होते.समारोपीय कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष डॉ.एम.सुभाष मंचावर उपस्थित होते.

सात दिवसीय शिबिराचे अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बल्की यांनी केले.
विशेष अतिथी श्री. रामभाऊ टोंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि श्री. अनेकशवर मेश्राम, उपसरपंच , ग्राम पंचायत, विसापूर यांनी स्वयंसेवकांना प्रशिक्षण शिबिर व एन. एस. एस. चे महत्व पटवून सांगितले.उपसरपंच निकिलेश चामरे आणि सहकार्यक्रम प्रा. गणेश येरगुडे यांनी स्वयंसेवकांना शिबिर शिक्षणातून जीवन घडवणुकीचे मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथी डॉ. एन. आर. बेग, डॉ. किशोर ठाकरे, डॉ. प्रवीण जोगी आदी उपस्थित होते.संचालन चैतन्य येनुरकर आणि साहीली कोटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एच. आर. आत्राम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here