Home गडचिरोली जनतेच्या समस्यांची जनप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही –...

जनतेच्या समस्यांची जनप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही – डॉ. नामदेव किरसान.

जनतेच्या समस्यांची जनप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही – डॉ. नामदेव किरसान.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- वडेगांव (मेंढा) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे जय हनुमान प्रासादिक नाट्य कला मंडळ, वडेगांव (मेंढा) यांच्या वतीने *” थैमान“* या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी प्रेक्षकांना सद्य वस्तुस्थिती अवगत करून देऊन सांगितले की, जनतेच्या महागाई बेरोजगारी व इतर स्थानिक समस्यांबद्दल तसेच रानटी हत्यांचा व नरभक्षी वाघांचा बंदोबस करण्याबद्दल जनप्रतिनिधी कोणतीही दहल घेत नसतील, समस्यांच्या सोडवणुकीसाठी शासनाकडे पाठपुरावा करीत नसतील किंवा संसदेत व विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत नसतील तर अशा निष्क्रिय जनप्रतिनिधींना पुन्हा निवडून न आणता परिवर्तन घडवून आणा असे आवाहन त्यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.रामकृष्णजी मडावी, उद्घाटक माजी आमदार हरीरामजी वरखडे, सह उद्घाटक माजी आमदार आनंदरावजी गेडाम, सरपंच सौ.शारदाताई मडावी , माजी सरपंच विनायक मडावी, माजी सरपंच विश्वेश्वरजी दरो, सरपंच टिकेश कुंभरे, भोवते सर,अक्षय भोवते, पुरुषोत्तम कुंभरे, सुभाष हर्षे, गेडाम साहेब, सौ. सुलचना कळाम, दत्तूजी सोमनकर, सुनील बांगरे, टेंभुर्णे साहेब, आशिष चौधरी, तामराज मडावी, रोहिदास मडावी, कीर्तीवाण मसराम, मिलिंद कोडापे, पो.पा. लतेश गेडाम, प्रल्हाद गेडाम, धनराज मडावी, पदाजी, पुरुषोत्तम किरमे, भाऊराव कुळशिंगे, नाजूक उसेंडी, इंद्रपाल उईके, सूर्यभान गेडाम, धनराजजी गेडाम, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेषक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here