Home गडचिरोली क्रीडा संकुलाच्या निर्मिती करीता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन नमो चषक...

क्रीडा संकुलाच्या निर्मिती करीता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन नमो चषक च्या नावाने लोकप्रतिनिधी कडून लाखो रुपयाची उधळन, मात्र क्रीडा संकुलाच्या निर्मितीस निधी देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष– महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप

क्रीडा संकुलाच्या निर्मिती करीता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन

नमो चषक च्या नावाने लोकप्रतिनिधी कडून लाखो रुपयाची उधळन, मात्र क्रीडा संकुलाच्या निर्मितीस निधी देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष– महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर
गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची (पोलीस, वनरक्षक भरती ) तयारी करणाऱ्या युवकांना अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल असावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना, भरीव निधी देऊन क्रीडा संकुलच्या कामास सुरुवात करण्यात आली, मात्र शिंदे – भाजप सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा स्टेडियम च्या कामास नियमित निधी दिल्या् जात नसल्याने क्रीडा स्टेडियम चे काम रखडले आहे, त्याचा अनेक खेळाडू आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांना त्रास होत आहे, त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलच्या कामाला लवकरात लवकर भरीव निधी देऊन सरकारने तातडीने क्रीडा संकुलाचे काम करावे या मागणीला घेऊन, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्टेडियम, गडचिरोली येते *”भिख मांगो आंदोलन”* करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जि. प. सदस्य नंदू नरोटे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, प्रभाकर कुबडे, सुरेश भांडेकर, दीपक रामने, आय. बी. शेख, ढिवरू मेश्राम, सुभाष धाईत, योगेंद्र झंजाळ, उत्तम ठाकरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ज्ञानेश्वर पोरटे, रामटेके, माजिद सय्यद, जावेद खान, प्रफुल आंबोरकर, मयूर गावतुरे, हेमंत कुमरे, सुदर्शन उंदीरवाडे, सीताराम सहारे, नेताजी गुरनुले सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यक्रते आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.
नमो चषक च्या नावाने लोकप्रतिनिधी कडून लाखो रुपयाची उधळन करून क्रीडा संमेलन घेतल्या जात आहे, ईडी सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा संकुलाच्या कामास निधी मिळत नसल्याने अनेक कामे खोडंबून पडली आहे, तरीही शासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असून, जिल्हा स्टेडियम चे मैदान पूर्ण अस्तव्यस्त पडले असल्याने त्याचा खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करनाऱ्या युवकांना नाहक त्रास करावा लागत आहे असा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here