Home चंद्रपूर शोकसंदेश शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपल – आ....

शोकसंदेश शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपल – आ. किशोर जोरगेवार

शोकसंदेश

शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपल – आ. किशोर जोरगेवार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-गजानन गावंडे गुरुजी उत्तम शिक्षक होते. त्यांनी शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे महत्वाची भूमिका बजावली होती. शिक्षकी पेशातुन निवृत्त झाल्यावर त्यांनी सामजिक आणि राजकिय क्षेत्रात आपले योगदान दिले. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. राजकारणासह ते एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने आज शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
सामाजिक आणि राजकिय जीवनात गावंडे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभायचे. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. अनेक कार्यक्रमा प्रसंगी त्यांची भेट होत असायची यावेळी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यात असलेली समाजकार्याची आवड लक्षात यायची. ते नेहमी प्रोत्साहीत करायचे, ते शिक्षकी पेशातून निवृत्त झाले मात्र समाज कार्यातुन ते कधीही निवृत्त झाले नाही. त्यांच्या अचानक आमच्यातून निघून जाण्याची वार्ता वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हाणी झाली आहे. माता महाकाली गावंडे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलेल्या शोकसंदेशातुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here