Home चंद्रपूर महाकाली यात्रा परिसराचा विकास आराखडा तयार करा – आ. किशोर जोरगेवार बैठक,...

महाकाली यात्रा परिसराचा विकास आराखडा तयार करा – आ. किशोर जोरगेवार बैठक, आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला मनपाच्या कामाचा आढावा

महाकाली यात्रा परिसराचा विकास आराखडा तयार करा – आ. किशोर जोरगेवार

बैठक, आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला मनपाच्या कामाचा आढावा

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-दर वर्षी चैत्र महिण्यात व नवरात्रोला महाकाली मंदिर येथे यात्रा भरते या यात्रा परिसराचा विकास करण्याची मागणी आपण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपणास कळविले आहे. त्या अनुषंगाने आपण तात्काळ महाकाली यात्रा परिसराचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगर पालिकेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विविध विकासकामांवर व नागरिकांच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, अशोक घराटे, शहर अभियंता अनिल घुमडे, स्वच्छता अधिकारी अमोल शेळके, अभियंता भोयर, टिकले, महाकाली मंदिरचे विश्वस्त सुनिल महाकाले, माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जयस्वाल,यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाअध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक विश्वजित शाहा, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, करणसिंग बैस, राम जंगम, बंगाली समाज महिला शहर प्रमूख सविता दंढारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, कौसर खान, मंगेश अहिरकर, बादल हजारे, वंदना हजारे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूरात आपण महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. हा महोत्सव चंद्रपूरकरांच्या लक्षणीय सहभागाने राज्यभरात पोहोचला आहे. त्यामुळे राज्यासह देशातील माता महाकाली भक्त चंद्रपूरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणार आहे. तसेच चैत्र महिण्यात येथे नांदेडची यात्रा भरते या यात्रेत नांदेडसह राज्याबाहेर भाविक लाखोच्या संख्येने दाखल होतात. मात्र येथे आपण अपेक्षीत अश्या सोयी सुविधा उपलब्ध करु शकलेलो नाही. त्यामुळे या यात्रा परिसराचा विकास व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार तसा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री यांनी महानगर पालिकेला आदेशीत केले आहे. आपण एक उत्तम असा आराखडा तयार करुन तो सादर करावा असे या बैठकीत ते म्हणाले.
भक्तांच्या राहण्याची सोय उत्तम असावी, पिण्याच्या पाण्याची सोय येथे असावी, आलेल्या भक्तासाठी सर्व सोयी सुविधा असाव्यात असा हा परिसर आपण तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते या बैठकीत म्हणाले.
चंद्रपूर शहर महानगर पालिका विविध अभिनव उपक्रम राबवित चंद्रपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र यात आपण सातत्य ठेवले पाहिजे. कर्मचारी ठराविक वेळेत कर्तव्यावर येतो का याकडे अधिका-यांचे लक्ष असले पाहिजे. पालीका स्वच्छतेबाबत जागृती करत आहे. मात्र या जनजागृती मोहिमेला आणखी गतीशील करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
अनेक भागात अमृत योजनेचे पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याकडे विशेष लक्ष द्या, चंद्रपूर महानगर पालिका अंतर्गत शहरात काम होत असतांना नागरिकांच्या समस्यांकडेही आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. विकासाचे काम करतांना नागरिकांना अडचण होणार नाही याची काळजी घेत नागरिकांच्या समस्या प्राथमीकतेने सोडवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here