Home चंद्रपूर १ फेब्रुवारीपासुन मनपातर्फे “सुंदर माझी घरगुती बाग स्पर्धेचे ” आयोजन

१ फेब्रुवारीपासुन मनपातर्फे “सुंदर माझी घरगुती बाग स्पर्धेचे ” आयोजन

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  ३१,जानेवारी – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहर सुंदर व हरित करण्यासाठी माझे योगदान या थीमवर सुंदर माझी घरगुती बाग स्पर्धा घेण्यात येणार असुन यात घरी छोटी बाग असणाऱ्या/ नविन बाग तयार करू इच्छिणाऱ्या तसेच टेरेस गार्डन/किचन गार्डन असणाऱ्या किंवा तयार करू इच्छिणाऱ्या स्पर्धकांना यात भाग घेता येणार आहे.

स्पर्धेत टेरेस गार्डन / किचन गार्डन व माझी अंगणातील बाग असे दोन भाग असुन दोन्ही स्पर्धांना प्रत्येकी ३ रोख व १० प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. १८ तारखेपासुन स्पर्धेत भाग घेण्यास नोंदणी सुरु झाली असुन नागरिकांना या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यात ५०० स्क्वे फुटपर्यत जागेत

गार्डन किंवा बागेची निर्मिती करणाऱ्यांना छोट्या तर ५०० स्क्वे फुटच्या जागेस मोठ्या गटात समाविष्ट केले जाणार आहे.
चंद्रपूर शहरातील वातावरण उष्ण आहे, या स्पर्धेच्या माध्यमातुन अधिकाधिक घरी बागेची निर्मिती होऊन शहरातील हरीत प्रमाण ( ग्रीन कव्हर ) वाढावे व पर्यावरणपुरक वातावरणाच्या निर्मितीत नागरिकांचा हातभार लागावा हा या स्पर्धेचा उद्देश असुन घरघुती बागेच्या निर्मितीने घराला सौंदर्य प्राप्त होण्याबरोबरच घर थंड राहण्यास देखील मदत होणार आहे.

              स्पर्धेची नोंदणी सुरु झाली असुन

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSczPHV_tPsfNPeVTXR8mPMo7LJIcsnYWKvhUgLQiM6szcMU4A/viewform या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल.सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

                        स्पर्धेच्या अटी – शर्ती –

1. जर भाडेकरू स्पर्धक असेल तर घरमालकाची ना हरकत परवानगी लागेल.
2. होम कंपोस्टिंग कायम स्वरूपी असणे आवश्यक राहील.
3. स्पर्धेत कोणतेही साहित्य मनपाद्वारे पुरविण्यात येणार नाही
4. स्पर्धेत थर्मोकॉलचा वापर करणे टाळावे.
5. स्पर्धकांचे सहभागीतेवर बक्षिसे रक्कम व रोख रक्कम कमी / जास्त करण्याचा अधिकार मनपाकडे राहील.

#UDD #urbandevelopment #urbandevelopmentdepartment #nagarvikasvibhag #chandrapur #chandrapurcity #chandrapurmunicipalcorporation #mazivasundhara #mazivasundharaabhiyan #tarracegarden #kitchengarden #greencover #competition

Maharashtra DGIPR Chandrapur Municipal Corporation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here