Home Breaking News चंद्रपूर पोलीस अधीक्षकांची बदली; हे असणार नवे अधीक्षक

चंद्रपूर पोलीस अधीक्षकांची बदली; हे असणार नवे अधीक्षक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  31 जानेवारी 2024: चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील शहर उपयुक्त मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रवींद्रसिंह परदेशी यांनी दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. राजकीय नेत्यांच्या खुणासह गोळीबार, जखमी आणि चोरीच्या घटना देखील वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी होत होती.

मुमक्का सुदर्शन यांनी नागपूरचे शहर उपयुक्त म्हणून नियुक्त झाले होते.रवींद्रसिंह परदेशी यांच्या बदलीमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये बदल झाला आहे.

रवींद्र सिंघल नागपूरचे नवे पोलिस आयुक्त नागपूर : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आता पुण्याचे नवे पोलिस आयुक्त राहणार आहेत. तर नागपुरात रवींद्रकुमार सिंघल हे नवे पोलिस आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले आहेत.

रवींद्र सिंघल हे सध्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आहेत. सिंघल यांनी नागपुरात यापूर्वीही विविध पदांवर काम केले आहे. गडचिरोली विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना पदोन्नती मिळाली असून आता ते नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून म्हणून काम करतील.

अमरावतीचे पोलिस आयुक्त एन.डी. रेड्डी यांनाही पदोन्नती मिळाली असून ते तेथेच पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त राहतील. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे पदोन्नतीवर गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक म्हणून येणार आहेत. नागपुरात कार्यरत असलेले पोलिस उपायुक्त एम. सुदर्शन हे चंद्रपूरला पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले पंकज कुमावत हे अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून येत आहेत. नागपूर ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्याकडे पोलिस अधीक्षक विशेष कृती गट नक्षल विरोधी अभियान ही जबाबदारी देण्यात आलीय. तर अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांची मुंबईला बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here