आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने महाकाली मैदानात रंगला कुस्तीचा महामुकाबला, सिकंदर ठरला अजिंक्य
हजारो चंद्रपूरकर बनले ऐतिहासिक कुस्तीचे साक्षीदार
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:-चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने 48 वर्षा नंतर चंद्रपूरातील महाकाली मैदानात कुस्तीचा महामुकाबला रंगला या कुस्तीत महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख याने राष्ट्रीय कुस्तीपट्टू दीपक काकरण याचा अवघ्या तिन मिनिटांच्या आत पराभव करत मानाच्या गदेचा मान मिळविला. तर यावेळी झालेल्या महिला कुस्तीत अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्या काकरण हिने पंजाब व हरियाना केसरी जसप्रीत कौर हिचा पराभव करत विजय मिळविला या स्पर्धेला महान भारत केसरी योगेश बोंबळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
सदर सर्व विजेत्या कुस्तीपट्टुंना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पूरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सेवादलचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, माजी नगरसेवक बलराम डोडाणी,अशोक मत्ते, माजी नगरसेवक पप्पू देशमुख, अशोक नागापूरे, सुनिता लोढीया, विना खणके, संदीप गड्डमवार, डाॅ. किर्तीवर्धन दिक्षित, मधुसूधन रुंगठा, अजय जयस्वाल, विजय चहारे, श्याम धोपटे, भालचंद्र दानव, मतिन शेख, कुणाल चहारे, सतिश भिवगडे, राजू शास्त्रकार, वासू देशमुख, सुहास बनकर, धनंजय येरेवार, प्रवीण जथाडे आदींची मंचावर उपस्थिती होती.
चंद्रपूरात मागील काही दिवसांपासून आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून विविध खेळांचे आयोजन केल्या जात आहे. यात क्रिकेट, बाॅडी बिल्डिंग, कबड्डी नंतर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माता महाकालीच्या मैदानात तब्बल 48 वर्षा नंतर कुस्तीचा थरार चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाला. यावेळी महान भारत केसरी योगेश बोंबाळे यांची विशेष उपस्थिती होती. गांधी चौकातून महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आणि पंजाब व हरियाना केसरी जसप्रीत कौर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. या दरम्यान विविध सामाजिक व क्रिडा संघटनांच्या वतीने रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सदर रॅली अंचलेश्वर गेट होत महाकाली मंदिरच्या पटांगणात पोहचली. त्यानंतर या विशेष कुस्ती सामन्यांना सुरवात झाली. यावेळी पंजाबचे कमलजित सिंग यांची वाशिमचे विजय शिंदे यांच्यात लढत झाली या लढतीत कमलजित सिंग या कुस्तीगीराचा विजय झाला. त्यानंतर पंजाब व हरियाना केसरी जसप्रीत कौर व अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्या काकराण यांच्यात लढत झाली या लढतीत अर्जुन पुरस्कार दिव्या काकराण हिने विजय मिळवत मानाची गदा मिळविली. या नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या सिकंदर शेख व राष्ट्रीय कुस्तीपटू दीपक काकरण यांच्यात कुस्तीचा थरार रंगला. या सामन्याला पंच म्हणून धर्मशील कातकर हे प्रसिध्द पंच लाभले होते. ही कुस्ती पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. या सामन्यात तिन मिनीटाच्या आत सिंकदर शेख याने प्रतिस्पर्धी दिपक यांचा पराभव करत विजय मिळविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूरचे मदने आणि प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभाग प्रमुख सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे, चंद्रशेखर देशमुख, बंगाली समाज विभाग महिला शहर प्रमूख सविता दंडारे, सायली येरणे, आदिवासी विभाग जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, राशिद हुसेन, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, प्रतिक शिवणकर करणसिंग बैस यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.
*चंद्रपूरातील कुस्तीला गतवैभव मिळवून देणार – आ. किशोर जोरगेवार*
1975 साला नंतर आपण चंद्रपूर मध्ये कुस्तीचा महामुकाबला घडवून आणला आहे. केवळ मनोरंजन हा या मागचा उद्देश नसुन वेसन मुक्त समाज आणि सृदृढ भावी पिढी घडविणे हा या मागचा मुख्य हेतु आहे. या स्पर्धेला आपण दिलेला प्रतिसाद उर्जा वाढविणारा आहे. आता दर वर्षी आपण येथे कुस्तीचे आयोजन करणार असून चंद्रपुरातील कुस्तीला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यात माजी कुस्तीगीरांचाही आम्हाला सहयोग लागणार आहे. पूढील वर्षीची कुस्ती मातीत खेळविण्याचा आमचा प्रयत्न असणार असेही ते यावेळी म्हणाले. तर यावेळी सिकंदर शेख म्हणाले कि, चंद्रपूरमध्ये प्रेम मिळाले. कुस्तीसाठी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे. आपणही आपल्या मुलांना कुस्तीसाठी तयार करावे असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात माजी कुस्तीपट्टुंचा सत्कार करण्यात आला.