तब्बल 70 दिवस उपोषण आंदोलन करणाऱ्या महिलांची व्यथा मनसेने समजून घेतली, खळखट्याक आंदोलनाची तयारी सुरु.
भद्रावती :-
तालुक्यातील बरांज के.पी.सी.एल. कंपनीच्या कोल माईन्स लि. चे प्रकल्पग्रस्त गावकरी व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा त्वरित मोबदला देऊन व त्यांच्या गावाचे पुनर्वसन करून महिलांचे आंदोलन सोडविण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल असा इशारा कंपनी व्यवस्थापन, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व तहसीलदार भद्रावती यांना दिलेल्या निवेदनातून मनसेने दिला आहे. दरम्यान या आंदोलनाची माहिती मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून मनसे तर्फे मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु आहे.
मागील जवळपास 70 दिवसापासून बरांज गावातील पुनर्वसन महिला मंडळ, (बंराज मोकासा) उपोषण आंदोलन करत असून कंपनी प्रशासनाने त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात ठोस पाऊले न टाकता केवळ मोगम आश्वासने देऊन वेळकाढुपणा चालवलेला आहे, स्वतःची छोटी छोटी मुलं घरी ठेऊन महिलांनी कोळसा खाणीच्या पाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता व त्या खाणीतचं आमरण उपोषण करत होत्या, खरं तर कंपनीच्या विरोधात महिलांना कोळसा खाणीत उतरून आंदोलन करण्याची वेळ यावी हीच खरी शोकांतिका आहे.पण निगरगट्ट प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांच्या सवेंदना मेलेल्या असल्याने त्या बिचाऱ्या महिलांना के.पी.सी.एल. कंपनी विरोधात आंदोलन करावे लागत आहे हे लोकशाहीच दुर्भाग्यचं म्हणावं लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले.दरम्यान मनसे वाहतूक सेना राज्य सरचिटणीस आरिफभाई शेख राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने व इतर मुंबई येथील मनसे पदाधिकाऱ्यांना कोळसा खाणीत आमरण उपोषण करणाऱ्या महिलांची भेट घेऊन हा विषय आम्ही राजसाहेब यांच्याकडे ठेऊ पण आपण आम्हांला निवेदन द्या असे कळवले होते. याबाबत महिलांनी सुद्धा मनसे पदाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले होते.
दिनांक 14/02/2024 ला जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या कार्यालयात पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार भद्रावती यांच्या समक्ष के.पी.सी.एल. कंपनी चे उच्चाधिकारी यांनी बैठक घेतली, दरम्यान जिल्हाधिकारी यांनी के.पी.सी.एल. कंपनी कडुन पुनर्वसन प्रक्रिया राबविण्यास विलंब होत असल्यामूळे नाराजी व्यक्त केली असे म्हटले आहे, दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पूनर्वसन प्रक्रिया अमलीकरणाची गती वाढविण्यासाठी निर्देश दिले. त्याप्रमाणे के.पी.सी.एल. कंपनी द्वारे हयाबाबत पुनर्वसन टिम गठीत केलेली आहे. सदर टिम पुनर्वसन स्थळी कॅम्प करून हयाबाबत लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करतील असे आश्वासन दिले, परंतु शेतीचा मोबदला व पुंर्वसन याबाबत त्वरित निर्णय घेऊन महिलांनी मागील 70 दिवसापासून चालवलेले आंदोलन मागे घ्यायला लावावे व महिलांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कंपनीचे ओबी व कोळसा उत्खनन बंद पाडून वाहतूक व्यवस्था ठप्प करेन व यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे, याबाबत निवेदनाची प्रत मनसे अध्यक्ष राजासाहेब ठाकरे यांना पाठविण्यात आली.
महिलांचे तात्पुरते कोळसा खाणीतील आंदोलन मागे,
आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचे हथियार उपसून प्रशासनाच्या नाकात दम आणणाऱ्या महिलांना तब्बल आठ दिवस कोळसा खाणीत अंधाऱ्या रात्री उपासीपोटी काढव्या लागल्या त्या दरम्यान त्यांच्या जिवाला हिंश्र प्राण्यापासून भीती होती व एक दिवस त्यांनी अवकाळी पाऊस व गारपीट यामध्ये रात्र काढली हा त्यांच्यासाठी भयंकर अनुभव होता, आपल्या चिमुकल्या मुलांना घरी ठेऊन गावकऱ्यांच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या महिलांचे काय झाले असतील हे त्यांनाच माहीत पण ही परिस्थिती कुणावर येऊ नये व त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याने प्रशासनाने यामध्ये काही मागण्या मान्य करून कोळसा खाणीतील आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली होती, त्यामुळे महिलांनी सकारात्मक भूमिका घेऊन कोळसा खाणीतील आंदोलन मागे घेतले पण कोळसा खाणीच्या वर असलेले आंदोलन सुरूच ठेवले आहे. यामध्ये असोसिएट व्हॉईस प्रेसिडेंट, बी.सी.एम.पी.एल.यांनी सुद्धा या संदर्भात सकारात्मक बाजू मांडल्याने येणाऱ्या समोरच्या काही दिवसात प्रश्न सुटेल अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली मात्र कंपनीच्या व्यवस्थापनाने यात कुचराई केल्यास पुन्हा महिला कोळसा खाणीत मोठे आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी महिलांसोबत असल्याने मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन सुरु करेल असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.